लालभडक ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणला विमानतळावर प...

लालभडक ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणला विमानतळावर पाहून चाहत्यांनी ‘झोमॅटो गर्ल’ म्हणत तिची खिल्ली उडवली (Deepika Padukone gets brutally trolled for latest airport look, netizens call her ‘Zomato Girl’)

गहराइयां चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण मागील काही दिवसांपासून बरीच चर्चेत होती. प्रत्यक्ष चित्रपट जरी फारसा चालला नसला आणि समीक्षकांनीही त्याच्यावर वाईट शेरा मारला असला तरी दीपिकाचे मात्र या सिनेमासाठी बरेच कौतुक झाले.

दीपिकाने अलीकडेच आपल्या ‘पठाण’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी स्पेनला जाण्यासाठी निघालेल्या दीपिकाला विमानतळावर लालभडक ड्रेसमध्ये पाहून लोकांनी अक्षरशः तिची खिल्ली उडवली आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाचा विमानतळावरील हा लूक खूपच व्हायरल होत आहे. तिने रेड कलरचा टर्टल नेक स्वेटर आणि रेड कलरची लेदर पँट घातली होती. त्याचबरोबर तिने रेड कॅप आणि रेड हील्सही घातली होती. तिच्या या ऑल रेड लूकमुळे चाहते अन्‌ युजर्सही तिला ट्रोल करत आहेत.

दीपिकाच्या या लूकवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी दीपिकाला लाल मिरची म्हटलंय तर कोणी तिला झोमॅटो गर्ल् म्हणत तिची खिल्ली उडवत आहे. कोणी म्हणतंय की, तिला अतरंगी रणवीर सिंहने प्रभावित केले आहे, तर कोणी तिच्या स्टाइलिस्टचे नाव-गाव विचारत आहे.

अलीकडेच शाहरुख, दीपिका आणि जॉनने एक व्हिडियो शेयर करून ‘पठान’ ची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख, जॉन आणि दीपिका यांचा धमाकेदार अभिनय पाहण्यास मिळेल. सध्या संपूर्ण टीम स्पेनला रवाना झाली आहे.