ऑस्करनंतरच्या पार्टीतला दीपिका पादुकोणचा नवा लू...

ऑस्करनंतरच्या पार्टीतला दीपिका पादुकोणचा नवा लूक व्हायरल, शॉर्ट पिंक फर ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत होती अभिनेत्री(Deepika Padukone Debuts New Look In Short Pink Dress For Oscars After Party, See Pics)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपल्या जबरदस्त लुकने चाहत्यांची मने जिंकली. दीपिका ऑफ शोल्डर ब्लॅक गाउनमध्ये ग्लोव्हजसह खूपच सुंदर दिसत होती. प्रेक्षकांच्या उत्साह आणि जल्लोषात, अभिनेत्री स्टेजवर आली आणि ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू-नाटू गाण्याच्या अप्रतिम कामगिरीची तिने सर्वांना माहिती दिली.

ऑस्करच्या बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीत नाटू नाटू हे गाणं जिंकल्यानंतर ऑस्कर पार्टी झाली. या ऑस्कर पार्टीत गुलाबी रंगाच्या शॉर्ट फर ड्रेसमध्ये दीपिकाचा नवा लूक पाहायला मिळाला. या नव्या लूकमध्ये आल्यानंतर दीपिकाने व्हॅनिटी फेअर पार्टीसाठी आपल्या हॉलिवूड आणि बॉलिवूड सहकाऱ्यांसोबत अनेक फोटो क्लिक केले.

दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या फर ड्रेसमध्ये क्लिक केलेली छायाचित्रे शेअर केली, त्यासोबत कॅप्शनमध्ये – ‘And #VFOscars @naeemkhannyc @cartier’ असे लिहिले. दीपिकाने ऑस्करमध्ये काळे हातमोजे, शॉर्ट गुलाबी फर ड्रेस असा वेगळाच लूक केला होता.

अभिनेत्रीने आपला लूक काळे हाय हिल्स, डायमंड ज्वेलरी, निळ्या रंगाचा डोळ्यांचा मेकअप आणि अंबाडा असा पूर्ण केला होता.

दीपिका पादुकोणचा हा ऑस्कर लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक लोकांची मने जिंकत आहे.

आलिया भट्ट, सामंथा रुथपासून ते कंगना राणावतपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर  अभिनेत्रीच्या या लूकचे कौतुक करत आहे.

अनेक भारतीय महिलांनीही सोशल मीडियावर दीपिकाचे कौतुक केले आहे. स्तुती करताना भारतीय महिलांनी लिहिले आहे- दीपिका पादुकोण किती सुंदर दिसते, संपूर्ण देशासोबत उभी राहणे, तुमची प्रतिमा, प्रतिष्ठा आपल्या नाजूक खांद्यावर घेणे आणि इतक्या सभ्यतेने आणि आत्मविश्वासाने बोलणे सोपे नाही. भारतीय महिला सर्वोत्तम आहेत याची दीपिका अप्रतिम उदाहरण आहे.