दीपिका पादुकोणची हॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक खेळी (D...

दीपिका पादुकोणची हॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक खेळी (Deepika Padukone Becomes Romantic In Hollywood)

Deepika Padukone, Hollywood

बॉलिवूडची मस्तानी ही उपाधी लाभलेली दीपिका पादुकोण आता हॉलिवूडच्या इंग्रजी चित्रपटात आपली अदाकारी गाजवणार आहे. क्रॉस कल्चरल ‘रोमॅन्टिक कॉमेडी’च्या इरॉस कॉर्पोरेशनमधील एका कंपनीशी तिने संधान बांधलं आहे. त्यानुसार दीपिका हॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक नायिका होणार आहे.

Deepika Padukone, Hollywood

दीपिकाने स्वतःच इन्स्टाग्राम स्टोरीवर ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या ‘का’ या निर्मिती संस्थेद्वारे ती या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. म्हणजे आता दीपिका अभिनेत्री व निर्माती म्हणून हॉलिवूड गाजवणार.

Deepika Padukone, Hollywood

हॉलिवूडमध्ये दीपिकाचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. तिने यापूर्वी ‘एक्स एक्स एक्स : द रिटर्न ऑफ जेंडर केज’ या इंग्रजी चित्रपटातून भूमिका केली होती. दीपिका हॉलिवूडमध्ये जाणार असली तरी बॉलिवूडमध्ये ती चांगलीच सक्रीय आहे.

Deepika Padukone, Hollywood