दीपिका पादुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ग्लोब...

दीपिका पादुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ग्लोबल अचीव्हर्स ॲवॉर्ड, हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री (Deepika Padukone Becomes Only Indian To Get Global Achiever Award For Best Actress)

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा फार मोठा चाहता वर्ग आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही तिचे फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडच्या वन ऑफ द बेस्ट दीपिकाने यंदाचा ग्लोबल अचीव्हर्स होण्याचा सन्मान मिळवला आहे. हा पुरस्कार मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

यंदाच्या २०२१ सालच्या या पुरस्काराकरिता ३ हजाराहून अधिक नॉमिनेशन्स आले होते. या पुरस्काराकरिता ओबामा, जेफ बेजोस, क्रिस्टियानो रोनाल्डो अशा जगभरातील अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या श्रेणीतील दिग्गजांच्या नावांचा समावेश होता.

दीपिका उत्कृष्टी अभिनेत्री आहे, अन्‌ जगभरामध्ये तिचे चाहते आहेत. सर्वच चाहते तिच्या अभिनया इतकेच तिच्या सौंदर्याचेही दिवाने आहेत. या आधीही दीपिकाने आशियातील सर्वाधिक प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळवला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वाधिक प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आलं होतं. आणि एका महिन्याच्या आतच दीपिकाला जागतिक स्तरावरील हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे.

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती सध्या हृतिक रोशन सोबतच्या फायटर या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या शिवाय ती शकुन बत्रा यांच्या एक अनटायटल्ड या सिनेमातही दिसेल.