दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांच्यात या कारणा...

दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांच्यात या कारणामुळे विस्तव जात नाही (Deepika Padukone And Katrina Kaif Has Hard Rivalry : Know The Reason)

दीपिका पादुकोण ही सध्याची बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री आहे. दीपिकाने बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्ये ही काम केल्याने तिचे चाहते जगभर पसरले आहेत. त्यामुळे दिपिका इंटरनॅशनल सेलिब्रेटी आहे असे  म्हटल्यास हरकत नाही. दिपिका प्रमाणेच अभिनेत्री कतरिना कैफ सुद्धा टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. कतरिनाने बाहेरच्या देशातून येऊनही बॉलिवूडमध्ये खूप चांगला जम बसवला आहे. कतरिनाचे चाहते सुद्धा जगभर आहेत.

या दोन्ही अभिनेत्री एकाच इंडस्ट्रीत काम करत असल्या तरी त्यांचे एकमेकींसोबत पटत नाही. आता तुम्ही म्हणाल  करीअरमध्ये स्पर्धा या असतातच. पण या दोघींमध्ये त्यांची इंडस्ट्रीमधील स्पर्धा हे अबोल्याचे कारण नाही. दीपिका पदुकोणला तर कतरिनाचा चेहरासुद्धा बघायची इच्छा नाही असे बोलले जाते.

दीपिकाने अभिनेता रणवीर सिंह सोबत तर कतरिनाने विकी कौशल सोबत लग्न केले असले तरी त्यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे दोघींचाही अभिनेता रणबीर कपूर एक्स बॉयफ्रेंड होता. रणबीरचे दोन महिन्यांपूर्वीच आलियाशी लग्न झाले पण तिच्याशी लग्न होण्यापूर्वी दीपिका आणि कतरिना या दोन्ही टॉपच्या अभिनेत्री त्याच्या आयुष्यात होत्या. कतरिनाच्या आधी दीपिका रणबीरची गर्लफ्रेंड होती. मात्र त्यांच्यामध्ये अचानक कतरिना आली.

रणबीरची कतरिनाशी जवळीक वाढू लागल्याने दीपिका व त्याचे नाते धोक्यात आले होते. कतरिनामुळेच दीपिका आणि रणबीर वेगळे झाल्याचे म्हटले जाते. दिपिकासोबत वेगळे झाल्यावर रणबीर कतरिनाला डेट करत होता. त्यावेळी दीपिकाची मानसिक स्थिती खूपच ढासळली होती.याबाबतचा खुलासा स्वत: दिपिकाने एका मुलाखतीत केलेला. याच कारणामुळे दीपिकाला कतरिनाचे तोंड पाहण्याचीही इच्छा नसल्याचे ती म्हणाली होती.

बॉलिवूडमध्ये एक काळ असा आला होता की सर्वत्र दीपिका आणि रणबीरच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. मात्र  अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कतरिना आणि रणबीरची जवळीक वाढण्यास सुरुवात झाली. त्याचा फरक दीपिका आणि रणबीरच्या नात्यावर पडला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे दीपिकाने रणवीर सिंह सोबत लग्न केले.