दिपेश भान होता एकदम तंदुरुस्त आणि निर्व्यसनी , ...

दिपेश भान होता एकदम तंदुरुस्त आणि निर्व्यसनी , १० दिवसांपूर्वीच केला होता संपूर्ण बॉडी चेकअप (Deepesh Bhan’s Death: Deepesh Never Had Alcohol, cigarettes, Did Full Body Health Check-up 10 Days Ago)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ मधील मलखान ही भूमिका साकारणारा अभिनेता दिपेश भानच्या अचानक मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी दिपेश भान क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. मैदानावर क्रिकेट खेळत असताना तो अचानक पडला. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ४१ वर्षीय दिपेश एकदम तंदुरुस्त होता आणि तब्येतीच्या बाबतीत खूप सजग होता, त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. विशेषत: ‘भाभीजी घर पर हैं’च्या संपूर्ण टीमला अजूनही विश्वास बसत नाहीये की, मलखान आता या जगात नाही.

दिपेश पूर्णपणे तंदुरुस्त होता, १० दिवसांपूर्वीच त्याने केला होता संपूर्ण बॉडी चेकअप

दिपेशच्या सहकलाकारांनी सांगितले की, दिपेश पूर्णपणे तंदुरुस्त होता. तो नेहमी व्यायाम करत असे. मृत्यूच्या १० दिवस आधीच त्याने संपूर्ण बॉडी चेकअप केला होता आणि त्याचे सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल होते. मृत्यूच्या दिवशीही तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता शिवाय क्रिकेट खेळत होता. अशा परिस्थितीत ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रोज व्यायाम करायचा, दारू सिगारेटपाहून दूर होता

दिपेश हा आरोग्याबाबत इतका जागरूक होता की त्याने दारू, सिगारेट किंवा अशा कोणत्याही वस्तूला कधी हात लावला नाही. इतकंच नाही तर तो फिटनेस फ्रीकही होता आणि दररोज ३-३ तास ​​जिममध्ये वर्कआउट करत असे. दिपेशने त्याचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याचे ६ पॅक अॅब्स स्पष्टपणे दिसत आहेत. दीपेश इतका फिट होता की त्याच्या जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

कौटुंबिक माणूस होता दिपेश

दिपेशचे तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लग्न झाले होते. २०२१ मध्ये तो एका मुलाचा बाबा बनला. त्यांचा मुलगा अवघ्या १८ महिन्यांचा आहे. तो अनेकदा कुटुंबासोबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असे. गेल्या महिन्यात त्याने पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फोटो शेअर केला होता. या क्षणी त्याच्या कुटुंबाला कोणत्या दुःखातून जावं लागत असेल, याचा अंदाज येऊ शकतो.