दीपक तिजोरीची मुलगी समाराचं बॉलिवूडमध्ये पदार्प...

दीपक तिजोरीची मुलगी समाराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण (Deepak Tijori’s Daughter Samara is Very Hot & Glamorous, She is Ready to Make her Bollywood Debut)

‘आशिकी’, ‘दिल है की मानता नही’, ‘खिलाड़ी’ आणि ‘कभी हां कभी ना’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून नावारुपास आलेला दीपक तिजोरी; मुख्य नायकाच्या भूमिकेत फारसा यशस्वी ठरला नाही. परंतु, सहाय्यक अभिनेता म्हणून लोकांनी त्यास विशेष पसंत केले.

नव्वदच्या दशकात प्रसिद्धीस आलेला दीपक तिजोरी दीर्घकाळ बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र त्याची मुलगी समारा तिजोरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून सतत चर्चेत असते.

समारा तिजोरी स्वतःचे हॉट फोटोज नेहमी आपल्या इन्स्टाग्राम वर शेअर करत असते. तिच्या या बोल्ड फोटोंचे अनेक चाहते आहेत.

समारा आता २५ वर्षांची झाली आहे आणि तिला अभिनयामध्ये आपलं करिअर करायचे आहे. यासाठी ती नृत्यापासून अभिनयापर्यंतचे धडे गिरवत आहे.

समाराने ‘ग्रँड प्लान’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये समाराने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघत प्रचंड हॉट सीन्स दिले होते. ज्यामुळे ती बरीच चर्चिली गेली होती.

या व्यतिरिक्त समाराने वरुण धवन आणि जॉन अब्राहमच्या ‘ढिशुम’ ला असिस्ट केले होते.

दीपक तिजोरीचं आपल्या मुलीवर अतिशय प्रेम आहे. समारा १३ वर्षांची असताना तिचे अपहरण झाले होते. या घटनेमुळे तो तिच्या बाबतीत फारच हळवा झाला आहे..

फार कमी लोकांना समाराच्या अपहरणाबद्दल माहिती आहे. २००९ साली समाराचे काही लोकांनी लोखंडवाला जवळील रस्त्यावर अपहरण केले होते. त्यानंतर ते तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. समाराने प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्यांची नजर चुकवत तेथून पळ काढला होता. परंतु तेव्हापासून दीपक तिजोरीला तिची जास्त काळजी वाटू लागली आहे.

इतर कलाकारांच्या मुलांप्रमाणे समारा नेहमी प्रकाशझोतात नसते, तरीही सोशल मीडियावर ती फारच चर्चेत असते.

दीपक तिजोरीने गर्लफ्रेंड शिवानी तनेजासोबत लग्न केले. समारा आणि करण ही त्यांची दोन मुलं आहेत.

वृत्तानुसार समारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते. परंतु ती कोणत्या चित्रपटातून या चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार ते अजून कळायचं आहे.