गुरमीत चौधरी आणि देबिनाने खास अंदाजात साजरी केल...
गुरमीत चौधरी आणि देबिनाने खास अंदाजात साजरी केली लेकींची पहिली होळी(Debina Bonnerjee And Gurmeet Choudhary Celebrate Lianna And Divisha’s First Holi With A Special Puja)

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे गुरमीत चौधरी आणि देबिना चौधरी या दोघांसाठी यंदाची होळी खूप खास होती. कारण ही होळी त्यांच्या मुली लियाना आणि दिविशा यांची पहिली होळी होती. दोन्ही मुलींसाठी होळी खास बनवण्यासाठी गुरमीत चौधरी आणि देबिना चौधरी यांनी खास पूजेचे आयोजन केले होते.
सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण होळीच्या रंगात न्हाऊन निघाले असताना गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी अगदी खास पद्धतीने होळी साजरी केली.

टीव्ही अभिनेत्री देबिनाने आपल्या मुलींच्या पहिल्या होळीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोंमध्ये देबिना, गुरमीत आणि त्यांच्या दोन मुली लियाना आणि दिविशा पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत.

प्रत्येकाचा चेहरा गुलालाने माखला आहे. अनेक फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे.

या फोटोंमध्ये देबिना आणि गुरमीत पूजा करताना दिसत आहेत आणि छोटी लियाना देबिनाच्या मांडीवर बसलेली आहे. लियानाने दोन्ही हात जोडले आहेत. फोटो शेअर करताना देबिनाने कॅप्शन लिहिले – ‘आमची वाली हॅप्पी होली’


लियाना आणि दिविशाच्या पहिल्या होळीच्या या फोटोंवर कपलचे चाहते खूप प्रेम व्यक्त करत आहेत. या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.