देबिना बॅनर्जीने शेअर केले आपल्या दुसऱ्या डोहाळ...

देबिना बॅनर्जीने शेअर केले आपल्या दुसऱ्या डोहाळे जेवणाचे फोटो (Debina Bannerjee Shares Pics From Her Baby Shower, Mom-to-be Debina looks stunning in traditional red flowy dress)

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी सध्या आपल्या आयुष्यातील सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. अभिनेत्री लवकरच दुसऱ्यांदा आई होणार असल्याने खूप खुश आहे. देबिना गरोदरपणात स्वत:ची खूप काळजी घेत आहे. तसेच आपल्या गरोदरपणाचा अनुभव वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकताच देबिनाकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोत देबिना खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे.

देबिना बॅनर्जीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्या घरी ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम बंगाली रितीरिवाजांनुसार पार पडला. कार्यक्रमात देबिना रॉयल लूकमध्ये दिसली. गोल्डन बॉर्डर असलेल्या रेड कलरच्या फ्लोई ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

 सिंदूर, कपाळावर टिकली, सोन्याचे वजनदार दागिने आणि चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप अशा लूकमध्ये देबिना खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यापासून देबिनाचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे.

याशिवाय देबिनाने लियानाचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. फोटोत लियाना एका गोंडस बाहुलीसारखी दिसत आहे. तसेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या दोघी गायीच्या वासराला काहीतरी खायला भरवत आहेत. कार्यक्रमात कामधेनूचे काही विधीही करण्यात आल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. मात्र देबिनाने आपल्या पोस्टमध्ये याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

फोटोंमध्ये देबिना आपल्या बेबी बंपचे अतिशय सुंदरपणे प्रदर्शन करत आहे.