दयाबेनची पुन्हा एकदा होऊ शकते तारक मेहतामध्ये ए...

दयाबेनची पुन्हा एकदा होऊ शकते तारक मेहतामध्ये एन्ट्री..निर्मात्यांची दिशासोबत बोलणी सुरु (Dayaben’s Entry May Happen Soon In ‘Taarak Mehta…’, Makers Started Talks With Disha Vakani)

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहताना प्रेक्षकांना दयाबेनची नेहमीच आठवण येते. या मालिकेत दिसणार्‍या इतर सर्व कलाकारांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. पण जेव्हापासून दिशा वकानीने ब्रेक घेतला आणि मालिकेपासून स्वतःला दूर केले तेव्हापासून प्रेक्षक तिला खूप मिस करत आहेत. दिशाने 3 वर्षांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत पुन्हा परतलीच नाही. पण लवकरच दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करू शकते. मालिकेत दयाबेनला गरबा क्विन म्हटले जायचे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी खास नवरात्रीची भेट म्हणून मालिकेत दयाबेनला पुन्हा आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांची दिशासोबत बोलणीसुद्धा चालू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा वकानीला या मालिकेत परत आणण्यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी अभिनेत्रीसोबत संपर्कही साधला आहे. दिशाला कोणत्याही किंमतीत मालिकेत परत आणायचे अशी शोच्या टीमची इच्छा आहे.पण जर दिशा या मालिकेत परतली नाही तर तिच्या जागी दुसरी अभिनेत्री आणावी लागेल. ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला दयाबेनची मालिकेत एन्ट्री व्हावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

 तीन वर्षांपूर्वी दिशा वकानी मॅटरनिटी रजेवर गेली होती. बाळ झाल्यावर दिशा मालिकेत परतणार असल्याचे बोलले जात होते. पण तिने तसे केले नाही. आता दिशा पुन्हा एकदा आई झाली आहे. दिशाने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर निर्माते असित मोदींनी एका मुलाखतीत दयाबेनच्या भूमिकेसाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याचे सांगितले होते.

पण आता दिशा वकानी लवकरच मालिकेत पुनरागमन करू शकते असे म्हटले जात आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. खरंच असं झालं तर प्रेक्षकांसोबतच निर्मात्यांसाठीही खूप आनंदाची गोष्ट असेल.

दिशा वकानीच्या जागी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती. त्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या सखुजा, काजल पिसाळ आणि राखी व्हिजन यांचा समावेश होता. मात्र, या सर्व केवळ अफवा ठरल्या.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम