कॉलेज जीवनात असं होतं ‘तारक मेहता’ ...

कॉलेज जीवनात असं होतं ‘तारक मेहता’ वाल्या दयाबेनचं रूप : बघा तिचे जुने फोटो (Dayaben Of ‘Tarak Mehta Ka Ooltah Chashma’ Looked Like This During College Days : See Her Throwback Photo)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांना रिझवीत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकांच्या आवडीचा झाला आहे. त्यात दयाबेनचा नंबर वरचा आहे दयाबेनची भूमिका करणाऱ्या दिशा वकानी या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळविले. गेल्या काही दिवसांपासून ती या कार्यक्रमातून गायब झालेली दिसते आहे. तरीपण तिच्या परतण्याची ते वाट पाहत आहेत. दरम्यान दिशा वकानीचा कॉलेज जीवनाचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यात तिला ओळखता येत नाही. मात्र तिचा हा फोटो लोकांना खूप आवडला आहे. त्यामध्ये ती दिसतेही सुंदर आणि ग्लॅमरस.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
या लोकप्रिय कार्यक्रमात दिशा वकानीचे दर्शन सध्या होत नाहीये. ती टी.व्ही. जगतापसून दूर आहे नि आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवते आहे. एक चांगली पत्नी आणि आई या नात्याने ती घरातील जबाबदाऱ्या सांभाळते आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दिशाने मयूर पांडयाशी २०१५ साली लग्न केलं. मयूर हा चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिचं नाव आहे स्तुती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दिशा मूळची अहमदाबादची आहे. ‘तारक मेहता’ मालिके बरोबरच कॉमसिन, लव्ह स्टोरी, देवदास, मंगल पांडे, जोधा अकबर या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम