बॉलीवुडसह टिव्ही कलाकारांनी आपल्या मुलींना दिल्...

बॉलीवुडसह टिव्ही कलाकारांनी आपल्या मुलींना दिल्या डॉटर्स डेच्या शुभेच्छा… (Daughter’s Day: Bollywood And TV Stars Share Heart-Warming Posts To Wish Their Daughters)

आज २६ सप्टेंबरला इंटरनॅशनल डॉटर्स डे साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी इंटरनॅशनल डॉटर्स डे साजरा केला जात आहे. आजचा दिवस सर्व मुलींसाठी खास आहे. या खास दिवसाचं औचित्य साधत बॉलिवूड तसेच टिव्हीवरील कलाकारांनी आपल्या मुलींना सोशल मीडियावर खास अंदाजात डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नीतू कपूर

Daughter’s Day, Bollywood

नीतू कपूरने मुलगी रिद्धिमा कपूर साहनीसोबतचा एक फोटो शेअर करून तिला डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत एक संदेशही लिहिला आहे – ‘हॅपी डॉटर्स डे… एका आईसाठी सगळ्यात मोल्यवान भेट’

कपिल शर्मा

Daughter’s Day, Bollywood
Daughter’s Day, Bollywood

कॉमेडी किंग कपिल शर्मा ने डॉटर्स डेच्या शुभेच्छा देत अनायराचे गोड फोटो शेअर केले आहेत. कपिलने लिहिलंय – ‘हॅपी डॉटर्स डे….

रोनित रॉय

Daughter’s Day, Bollywood
Daughter’s Day, Bollywood

रोनित रॉयने देखील आपल्या मुलीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या मुलीसोबत तिच्या बालपणीचा आणि आताचा फोटो शेअर केला आणि लिहिलंय – ‘तेव्हा… आता… कायम…’हॅपी डॉटर्स डे माय लिटल पम्पकिन…’

संजय कपूर

Daughter’s Day, Bollywood

अभिनेता संजय कपूरनेही आपली मुलगी शनाया कपूरला या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शनायाचे काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिलंय – ‘हॅपी डॉटर्स डे… आम्हाला तुझा अभिमान आहे.’

कुणाल खेमू

Daughter’s Day, Bollywood

कुणाल खेमूचं आपल्या मुलीसोबत इनायासोबत अतिशय घट्ट असं बॉन्डिंग आहे. आपल्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडियो तो सतत पोस्ट करत असतो. आज डॉटर्स डेच्या निमित्ताने त्याने एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कुणाल आपल्या मुलीसाठी कविता म्हणतो आहे.  त्याच्या कवितेच्या ओळी सांगतात की – तुझी ओळख तुझ्या कामातून होवो, माझे नाव तुझ्या नावामुळे व्हावे, तुझ्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी तुझे निर्णय पक्के असावेत, मुलींपेक्षा मोठी पुंजी कोणतीच नाही, असे त्याने कवितेतून म्हटले आहे. त्याने आपल्या मुलीसोबतच जगभरातील सर्वच मुलींच्या पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन

Daughter’s Day, Bollywood
Daughter’s Day, Bollywood

अमिताभ बच्चन यांचे आपल्या मुलीवर किती प्रेम आहे हे आपण जाणतोच. त्यांनी श्वेता बच्चनसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह त्यांनी ‘हॅपी डॉटर्स डे… ‘ असं म्हटलं आहे. त्यांनी दुसऱ्या एका फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘प्रत्येक दिवस माझ्या मुलीसाठी समर्पित…’