श्रीदेवीच्या तिसऱ्या पुण्यतिथी दिनी मुली झाल्या...

श्रीदेवीच्या तिसऱ्या पुण्यतिथी दिनी मुली झाल्या भावुक; जाह्नवीने शेअर केली मॉमने लिहिलेली चिठ्ठी (Daughters became emotional on Sridevi’s third anniversary; Jahnavi shared a note written by Mom)

फोटो सौजन्य : गूगल

बॉलीवुडमधील रूप की रानी श्रीदेवी जाऊन तीन वर्षं झाली. तिनशेहून अधिक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची ताकद दाखवलेली श्रीदेवी आता आपल्यांत नाही. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबई येथील एका हॉटेलमधील बाथटबमध्ये श्रीदेवी मृतावस्थेत सापडली होती. मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेली होती. श्रीदेवीच्या अचानक मृत्युमुळे संपूर्ण देशालाच धक्का बसला होता. अनेक वर्षे आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या श्रीदेवीच्या मृत्यूवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. तिच्या जाण्याने जरी चाहत्यांचे डोळे भरून आले असले तरी आजही तिचे चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

फोटो सौजन्य : गूगल

‘मॉम’ हा श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला. परंतु कमालीची गोष्ट अशी आहे की आपल्या शेवटच्या चित्रपटापर्यंत या अभिनेत्रीने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका न करता मुख्य अभिनेत्रीची भूमिकाच केली. खरं तर तिच्या वयाच्या अभिनेत्री त्यावेळेस सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. मॉममध्ये श्रीदेवीने एका परफेक्ट आईची भूमिका केली. शिवाय खऱ्या आयुष्यातही श्रीदेवी एक चांगली आई होती. आपल्या सुपरस्टारडमला श्रीदेवीने कधीही आपल्या मातृत्त्वाच्या मधे येऊ दिलं नाही. जाह्नवी आणि खुशी या दोघींसाठी श्रीदेवी नेहमी हजर असायची. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी ती स्वतः आणायची. जाह्नवीने बॉलिवूडमध्ये यावे यासाठी श्रीदेवीने स्वतः तिला ट्रेन केलं होतं. परंतु आपल्या मुलीचा बॉलिवुडमधील डेब्यु पाहण्यासाठी ती राहिली नाही.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

आज आपल्या आईच्या तिसऱ्या पुण्यतिथी दिनी जाह्नवी श्रीदेवीच्या आठवणीने भावूक झाली. आपल्या आईने हाताने लिहिलेली चिठ्ठी तिने पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिलंय,‘ आई लव यू माय लब्बू, यू आर द बेस्ट बेबी इन द वर्ल्ड’ या पोस्टसोबत जाह्नवीने फक्त ‘मिस यू’ असं लिहिलंय. जाह्नवी वरचेवर आपल्या आईचे फोटो सोशल अकाउंटवर पोस्ट करत असते आणि तिची आठवण काढत असते.

फोटो सौजन्य  : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

आज श्रीदेवी आपल्यात नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने तिचे चाहते तिची आठवण काढत असतात. जाह्नवी कपूरमध्ये लोक श्रीदेवीला शोधतात. अलिकडेच जाह्नवीने आपल्या ‘रुही’ चित्रपटातील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून लोकांनी कमेंट केली की, ‘जाह्नवी अगदी आपली आई श्रीदेवीसारखीच दिसत आहे.’

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम और गूगल

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम और गूगल

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम और गूगल

जाह्नवी कपूर नंतर आता खुशी कपूर देखील चित्रपटामध्ये येणार असल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले आहे. श्रीदेवीच्या पुण्यतिथी दिवशी खूशीनेही बोनी कपूर आणि श्रीदेवीचा जुना फोटो शेअर करून आपल्या आईचे स्मरण केले आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

श्रीदेवीच्या पुण्यतिथीसाठी कुटुंबियांनी पुजा आयोजित केली असून त्यासाठी मुली जाह्नवी आणि खुशी आपल्या वडिलांसोबत बोनी कपूरसह चैन्नईला पोहचले आहेत. ही पूजा श्रीदेवीच्या चैनई येथील घरी केली जात आहे. श्रीदेवी जरी या जगात नसली तरी तिच्या स्मृती कायम राहणाऱ्या आहेत.