बेधडक आणि बिनधास्त पात्र रंगविणाऱ्या शिवानीने द...

बेधडक आणि बिनधास्त पात्र रंगविणाऱ्या शिवानीने दोनच दिवसात बुलेटवर ठोकली मांड (Dashing Shivani Rides Bullet In Just 2 Days)

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिका महाराष्ट्रात तूफान गाजते आहे. संजू आणि रणजीत ढालेपाटील म्हणजेच शिवानी सोनार – मनिराज पवार या राजा-राणीच्या जोडीला मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे. मालिकेतील संजूचा बेधडक आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना आवडू लागला आहे. कुटुंबाबरोबरच पोलिसाच्या नोकरीची जबाबदारीही ती प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे.

मालिकेच्या सुरुवातीला संजूचा TOKKKK असा आवाज काढणे संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालं होतं आणि अजूनही फेमस आहे. संजू PSI झाल्यापासून ती पोलिस चौकीच्या कामात, गुन्हेगारांना शिक्षा देण्यात बरीच व्यग्र असते आणि यामध्ये संजूला रणजीतची खंबीर साथ आहेच. नुकतचं एका सीनचं शूटिंग सुरू असताना संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा स्वॅग बघायला मिळाला. शिवानीला कामाचा एक भाग म्हणून बुलेट शिकावी लागली. मनिराज म्हणजेच रणजीतकडे स्वत:ची बुलेट असल्याने त्यानेच हॉटेलच्या परिसरात शिवानीला बुलेट चालवायला शिकवले. अन्‌ शिवानीने देखील अवघ्या एक – दोन दिवसातच बुलेटवर मांड ठोकली.