डॅशिंग माधुरी पवारचे बिनधास्त, हॉट फोटो शूट (Da...

डॅशिंग माधुरी पवारचे बिनधास्त, हॉट फोटो शूट (Dashing Madhuri Pawar’s Bold And Hot Photo shoot)

‘देवमाणूस’ ही थरारक मालिका संपून कितीतरी दिवस झाले, पण त्याचं कवित्व बाकी आहे. त्या मालिकेत चंदा हे डॅशिंग पात्र साकार करणारी अभिनेत्री माधुरी पवार प्रेक्षकांच्या मनात रुतून बसली आहे. कारण माधुरीने चंदाची भूमिका ठसकेबाज रीतीने सादर केली होती.
चंदाच्या भूमिकेत माधुरी साडीमध्ये वावरली होती. परंतु प्रत्यक्ष जीवनात ती आधुनिक तरुणी आहे. तिला वेस्टर्न कपडे घालायला आवडतात.

माधुरीला इतकी लोकप्रियता मिळाली आहे की, गावोगावी सणसमारंभाला, उदघाटनाला तिला बोलावत असतात. या सर्वच इव्हेंट्स मध्ये ही कमालीची बिझी असते.

अलीकडेच तिने कमालीचे हॉट फोटोशूट केले. पांढऱ्या  टॉवेलात ती बिनधास्त वावरली आहे. सावळ्या  वर्णाची , कमनीय बांध्याची माधुरी या फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते आहे.
‘देवमाणूस’ च्या आधी माधुरी पवार ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दिसली होती. ती उत्तम डान्सर असल्याने ‘नादखुळा’ व इतर अनेक व्हिडीओ अल्बम्समधून ती चमकली आहे. ‘गागरा’ ही  वेब सिरीज आणि ‘फांजर’, ‘फौजदार’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत. ‘फक्त तूच’ हा नवा चित्रपट तिने नुकताच करारबद्ध केला आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित हिंदी वेब सिरीजमध्ये माधुरीची महत्वाची भूमिका आहे.