अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाशी संबंधित काही पडद...
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाशी संबंधित काही पडद्यामागील रहस्यं… (Dark Secrets of the Bachchan Family)

कोरोनामुळे मागील दीडेक वर्ष जगभरात दहशत पसरली होती. आता मात्र पूर्णपणे अनलॉक करण्याची प्रक्रिया भारतात सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, सामान्य लोकांप्रमाणे, बॉलिवूड आणि टिव्ही सेलेब्स देखील आपापल्या कामावर परतले आहेत. त्याचबरोबर सेलेब्सशी संबंधित अनेक गोष्टी, थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित काही रहस्ये देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बच्चन कुटुंब नेहमीच सर्वांपासून लपवून ठेवत आलेली ही रहस्यं कोणती आहेत, ते तुम्हाला माहीत आहेत का?

अमिताभ आणि संपूर्ण बच्चन कुटुंब नेहमीच सर्वांचे आवडते राहिले आहे. विशेषत: बच्चन कुटुंबियांचे एकमेकांमध्ये दिसून येणारे बॉण्डींग सर्वांना आवडते. परंतु त्यांच्यातील बॉण्डींगबरोबरच एक सत्य हेही आहे की, प्रत्येक कुटुंबाप्रमाणेच बच्चन कुटुंबाकडेही काही रहस्ये आहेत, परंतु ते त्यांच्या सामाजिक प्रतिमेबाबत अत्यंत जागरूक असल्याने, त्यांनी आपल्या कुटुंबाशी संबंधित कोणत्याही नकारात्मक गोष्टी समोर येऊ दिल्या नाहीत.
खूप कमी लोकांना माहीत आहे की बिग बींची मुलगी श्वेता बच्चनचा घटस्फोट झाला आहे. श्वेता गेल्या काही वर्षांपासून तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे. जेव्हा जेव्हा अमिताभजींच्या कुटुंबाचे फोटो समोर येतात, त्या फॅमिली फोटोमध्ये श्वेता आवर्जुन दिसते.

एवढेच नाही तर श्वेताच्या इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांचे फोटोदेखील दिसतात, त्यांची मुलगी, मुलगा ते मेहुण्यापर्यंत सर्व असतात पण, तिचा पती निखिल नंदा या फोटोंमध्ये कधीही दिसला नाही. बातमीनुसार, दोघांचा घटस्फोट झाला आहे, परंतु बच्चन कुटुंबाने ही गोष्ट आत्तापर्यंत लपवून ठेवली आहे. कारण त्यांना वाटते की घटस्फोटाची बाब बच्चन कुटुंबाच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकते.

श्वेता बच्चनचे निखिल नंदाशी १९९७ मध्ये खूप लहान वयात लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी नव्या नवेली नंदा आणि मुलगा अगस्त्य नंदा. श्वेताचे निखिलसोबतचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
जया आणि श्वेता मायलेकी जेव्हा जेव्हा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये दिसतात, तेव्हा मायलेकींच्या चेहऱ्यावर प्रेम आणि स्मित दिसते. त्यांचे फोटो पाहून असे वाटते की, दोघी एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, पण ते खरे नाही. वास्तविक, श्वेताचे लग्न अवघ्या २१व्या वर्षी झाले होते आणि तेही आई जयाच्या दबावामुळे तिला इतक्या लवकर लग्न करावे लागले. श्वेता तिच्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हती. आणि सुत्रांनूसार श्वेता अजूनही आपल्या आत्ताच्या परिस्थितीला आणि तिच्या घटस्फोटाला आईला कारणीभूत मानते.
अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रसृष्टीचे महानायक म्हटले जाते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण असे असूनही, आर्थिकदृष्ट्या दिवाळं निघाल्यानंतर त्यांच्यावर बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याची पाळी आली होती.
श्वेता बच्चनचे तिची वहिनी ऐश्वर्या राय बच्चनसोबतही फारसे पटत नाही. अशीही बातमी आहे की, त्यांच्यात इतका दुरावा आहे की दोघी एकमेकांशी बोलतही नाहीत. सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमात एकत्र असताना त्यांच्यातील हा तणाव आणि दुरावा स्पष्टपणे दिसून येतो.

असे म्हटले जाते की, श्वेताला करिश्मा कपूर वहिनी म्हणून हवी होती. श्वेता आणि करिश्मा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. म्हणूनच अभिषेकने करिश्मासोबत लग्न करावे अशी तिची इच्छा होती.

दुसरीकडे अशीही बातमी आहे की, जया बच्चन यांना ऐश्वर्या राय ही सून म्हणून पसंत नव्हती. तिला अभिषेकचे लग्न राणी मुखर्जीशी करायचे होते. ऐश्वर्याच्या लोकप्रियतेमुळे ती त्यांची पहिली पसंती कधीच नव्हती.

बिग बींची नात नव्या नंदा देखील तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत राहिली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबतचे तिचे नाते देखील एका एमएमएसच्या लीक झाल्याने प्रकाशझोतात आले होते. नव्याचे नाव जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरीसोबतही जोडले गेले आहे.