‘नवे लक्ष्य’ मधील युनिट ९ ला मिळणार जाबाज पोलि...

‘नवे लक्ष्य’ मधील युनिट ९ ला मिळणार जाबाज पोलिसांची साथ (Daredevil Police Officers From Other Serials Come To The Rescue Of ‘Nave Lakshya’ Serial Police)

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका विषयांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. स्टार प्रवाहवर ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) ही मालिका पोलिसांच्या धाडसाचं कौतुक आणि गुन्हेगारांना जेरबंद करणारी ही मालिका आपलं मनोरंजन करण्यासाठी नेहमी सज्ज असते. नुकतंच या मालिकेने लक्षवेधी वळण घेतले आहे. नवे लक्ष्य मालिकेतील युनिट ९ नवनव्या गुन्ह्यांचा तपास करत असतात. यावेळी युनिट ९ च्या टीमला जाबाज पोलिसांची साथ मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील एएसपी कीर्ती, लग्नाची बेडी मालिकेतील एसपी राघव आणि अबोली मालिकेतील सीनियर पीआय अंकुश एका सेक्स स्कॅण्डलच्या तपासासाठी युनिट ९ च्या टीमची साथ देणार आहेत. निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी हे पोलीस अधिकारी एकत्र आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच २४ जुलैला दुपारी १ वाजता, सायंकाळी ७ वाजता आणि रात्री १० वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

आतापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना आपण त्यांच्या मालिकांमध्ये गुन्ह्यांचा तपास करताना पाहिलं आहे. मात्र नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने हे सगळे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे महाएपिसोडची रंगत वाढणार हे नक्की.