नऊवारी साडी नेसून मोटरसायकल वर रमिला लटपटेची जग...
नऊवारी साडी नेसून मोटरसायकल वर रमिला लटपटेची जगभ्रमंती सुरू (Dare Devil Ramila Latpate Flags Off Her World Tour On Motorcycle By Wearing 9 Yard Marathi Saree)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया भाषणाने प्रेरित होऊन जगभरात भारताची डेव्हलप इंडिया व्हिजनची छबी पसरविण्यासाठी मोटरसायकलने जगभ्रमंतीचा मानस केला असून महिला दिनाचे औचित्य साधत आज त्याची सुरुवात करित आहे. असे प्रतिपादन भारत की बेटीच्या नावाने ओळखली जाणारी रमाबाई म्हणजेच रमिला लटपटेने केले आहे. आज जगभ्रमंतीच्या फ्लॅग ऑफ प्रसंगी ती बोलत होती.
भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आता मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून तरुणी रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीचा प्रवास करून एक नवीन इतिहास रचणार आहे. त्याची सुरुवात काल ९ मार्च रोजी गेट-वे-ऑफ पासून झाली असून सुमारे ३६५ दिवसात प्रवास करून ८ मार्च २०२४ रोजी पुन्हा भारतात परतणार आहे. जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३०देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास पूर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेले विविध साहित्य, पदार्थ आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत भारत व महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे.
रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. यापूर्वी रमाबाईने भारतातील अनेक ठिकाणी मोटरसायकलने प्रवास केला आहे, त्यामुळेच जगभ्रमंतीचा ध्येय जोपासले आहे.रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात. —————