दलजित कौरच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवा...

दलजित कौरच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात, पाहा मेहंदीचे फोटो(Dalljiet Kaur Flaunts Her Mehndi, Glimpse of Love Story and Family in Unique Design)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शालीन भानोतची माजी पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. दलजीत आज आपला प्रियकर आणि यूके स्थित बिझनेसमन निखिल पटेलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नववधू दिलजीत कौर हिच्या हातावर निखिलच्या नावाची मेहंदी सजली आहे. दलजीतने मेहंदी कार्यक्रमाचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. मेहंदीच्या अनोख्या डिझाईनमध्ये तिची प्रेमकहाणी आणि कुटुंबाची खास झलक पाहायला मिळत आहे.

दलजीत कौरचे यापूर्वी शालीन भानोतसोबत लग्न झाले होते आणि या जोडप्याला झेडेन नावाचा मुलगाही आहे. तर  निखिल पटेल देखील आधीच विवाहित होता त्यालाही दोन मुली आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही मुलांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्रीने आपला मेहेंदी समारंभासाठी एक साधा लूक केला होता. त्यात तिने रंगीत स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला. आपले केस मोकळे ठेवले आणि हलका मेकअप केला होता. दलजीतच्या हातावरील मेहेंदी खूप खास आहे कारण तिने मेहंदीच्या डिझाइनमध्ये तिची प्रेमकथा आणि कुटुंब या दोघांची झलक दाखवली आहे. एका हातात दिलजीत आणि निखिलची झलक तर दुसऱ्या तळहातावर त्यांचे सुंदर कुटुंब दिसते.

दलजीतची मेहंदी सुंदर असण्यासोबतच एक विशेष संदेशही देते, या मेहंदीमध्ये त्यांच्या प्रेमकथेसह कुटुंबाचा प्रेम संदेश दडलेला आहे. या सोहळ्यादरम्यान बोलताना दलजीत म्हणाली की मला माझ्या नवीन आयुष्याबद्दल एक वेगळीच उत्सुकता वाटत आहे, पण सोबत मी थोडी चिंताग्रस्तही आहे.

मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, माझे लग्न आणि नवीन आयुष्याबद्दल वेगळाच उत्साह आहे, पण वेळ वेगाने धावत असल्याने मी खूप घाबरलेली आहे. लग्नाला 10-15 दिवस आहेत असं आधी वाटत होतं, पण आता ती वेळ अगदी जवळ आली आहे. दलजीतने सांगितले की, देशभरातून आणि जगभरातून माझा मित्रपरिवार या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी येत आहेत.

यासोबतच अभिनेत्रीने सांगितले की, मी माझ्या आयुष्यातील या खास दिवसासाठी खूप दिवसांपासून तयारी करत होती. लग्नासाठी तंदुरुस्त दिसण्यासाठी, ती बऱ्याच काळापासून डाएटिंग करत आहे आणि लग्नाच्या दिवसापर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने सांगितले की, मी काही दिवसांपूर्वी डाएटिंग आणि जिमिंगला सुरुवात केली होती, परंतु तयारीमध्ये व्यस्त असल्यामुळे मला जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला नाही.

अलीकडेच दलजीत कौरने बॅचलरेट पार्टी केली होती, ज्याची झलक अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली होती.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम