दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीक...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर (Dadasaheb Phalke Award Will Be Conferred Upon Actor Rajinikanth).

By Atul Raut in मनोरंजन , फिल्मी चक्कर
बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात एक अढळ स्थान मिळवणारे सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली.

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत असा हा पुरस्कार मानला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. शाल, सुवर्णकमळ आणि रोख १० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराची सुरुवात १९६९ साली करण्यात आली होती. ३ मे रोजी सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.