यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिय...
यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट अन् रणबीर कपूर ठरले सर्वोत्कृष्ट (Dadasaheb Phalke Award 2023)

मुंबईत नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३’ पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याची चांगली धामधूम पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि तिच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
पण रणबीर हा आगामी चित्रपटाच्या शूटींगनिमित्ताने बाहेर असल्याने तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला.
Alia Bhatt and Ranbir Kapoor win Dadasaheb Phalke International film festival awards 2023
— ANI Digital (@ani_digital) February 20, 2023
Read @ANI Story |https://t.co/q0gnTD9mHz#aliabhatt #ranbirkapoor #DadaSahebPhalkeAwards2023 pic.twitter.com/8oSR73xo9z
जाणून घेऊया अन्य विजेत्यांची यादी…
सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: भाग १)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता: ऋषभ शेट्टी (कांतारा)
चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: रेखा
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस
क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट: RRR

वर्षभरातील सर्वोत्तम दूरदर्शन मालिका: अनुपमा
यंदाच्या वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: अनुपम खेर (काश्मीर फाइल्स)
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावा)
सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन (मैय्या मैनु)
सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)

संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: हरिहरन दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि आलिया यांच्या व्हिडीओवर सर्वांच्या नजरा खिळल्या. या पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर रेखा यांनी सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.