जान्हवी कपूरच्या वाढदिवशी, तिचे पप्पा बोनी कपूर...

जान्हवी कपूरच्या वाढदिवशी, तिचे पप्पा बोनी कपूरने केले तोंड भरून कौतुक (Dad Boney Kapoor Wishes Janhvi Happy Birthday, Lists All Her Qualities)

जान्हवी कपूरआज आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने तिचे पप्पा, निर्माते बोनी कपूर यांनी तिचा छानसा फोटो आणि भावनिक पोस्ट पेश करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बोनी कपूर यांनी इन्स्टाग्राम वर जान्हवीच्या बालपणाचा फोटो शेअर करून लिहिलं आहे, ‘आमच्या जीवनातील आनंद . तू जशी आहेस, तशीच साधी, डाऊन टू अर्थ, प्रत्येकाला इज्जत देणारी राहा. तुझे हे गुण तुला खूप यशावर नेतील. हॅप्पी बर्थ डे बेटा!’

हॅप्पी बर्थ डे टू माय ट्रिलियन डॉलर बेबी,’ असेही त्यांनी जान्हवीचा लहानपणीचा फोटो टाकून म्हंटल आहे. जान्हवी आणि ख़ुशी या आपल्या दोन्ही मुलींवर पप्पा बोनी कपूर नेहमीच प्रेम व्यक्त करतात. म्हणूनच त्यांनी याही खेपेला जान्हवीला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

बोनीच्या या पोस्टवर काही मान्यवर आणि जान्हवीच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अन बरेच हार्ट इमोजीज तिला पाठवले आहेत.

धाकटी बहीण खुशीने, दोघींचा बालपणीचा जुना फोटो टाकून ‘हॅप्पी बर्थ डे टू मायएव्हरीथिंग’ असा मजकूर लिहिला आहे.

‘गुडलक जेरी’ आणि ‘मिली’ या दोन्ही चित्रपटांमधून जान्हवी लवकरच दिसेल. तर ‘मिस्टर अँड ऍण्ड  मिसेस माही’ तिचा आगामी चित्रपट निर्माणाधीन आहे.