संस्कारी बहू गोपी म्हणून मानाचा पाट मिळालेली दे...

संस्कारी बहू गोपी म्हणून मानाचा पाट मिळालेली देवोलीना, टू – पीस मध्ये दिसतेय् सॉलिड हॉट! (Cultured Gopi Bahu Turned Hot Babe; Devoleena Bhattacharjee Looked Glamorous In A Two-Piece)

टेलिव्हिजनची लोकप्रिय देवोलीना भट्टाचारजी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत संस्कारी सुनेची भूमिका करून तिने लोकांची मने जिंकली आहेत. मात्र छोट्या पडद्यावर शांत आणि सुशील दिसणारी देवोलीना खासगी जीवनात बोल्ड आणि बिनधास्त. सोशल साईट्‌स वर ती ज्या ग्लॅमरस्‌ पोस्टस्‌ टाकते, त्यातून हेच नजरेला पडतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Devoleena Bhattacharjee

आता हेच पाहा ना! नुकताच तिने सोशल मीडियावर आपला ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये दिसतंय्‌ की, देवोलिना स्वीमिंग पूलमध्ये उभी राहून थंड पाण्याचा अनुभव घेते आहे.

देवोलिनाचा हा इन्स्टाग्रामवरील फोटो नाशिक मधील एका रिसॉर्टमध्ये घेतलाय्‌. तिथे ती सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. ती पूर्णतः भिजलेली आहे. केस मोकळे सोडलेले आहेत. डोळ्यांवर गॉगल आहे. तिचे ओलेते शरीर आणि कमरेवर काढलेला रंगीत टॅटू सगळ्यांची नजर खेचून घेत आहे. तिने परवाच्या दिवशी आपला ३६ वा वाढदिवस नाशिकला साजरा केला. त्या निमित्त काढलेले हे फोटो आहेत.

Devoleena Bhattacharjee

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

याआधी देवोलिनाने एक व्हिडिओ शेअर केला होता. तो पाहून ही सीधीसाधी गोपी बहू आहे, यावर लोकांचा विश्वास बसला नव्हता. तरीपण त्यांना तिचे हे बोल्ड लूक आवडले होते.

Devoleena Bhattacharjee

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Devoleena Bhattacharjee

देवोलिना भट्टाचारजीच्या कामकाजाबाबत बोलायचं तर ‘साथ निभाना साथिया’ मधून तिच्या टी. व्ही. कारकिर्दीस सुरुवात झाली. अन्‌ बिग बॉसच्या १३व्या सीझनमध्ये ती आली होती. त्यातून तिला जास्त लोकप्रियता लाभली.