घरामध्ये क्रिस्टल ट्री ठेवणे लाभदायक (Crystal T...

घरामध्ये क्रिस्टल ट्री ठेवणे लाभदायक (Crystal Tree Benefits For Home)

घरामध्ये क्रिस्टल ट्री ठेवल्याने कोणते लाभ होतात?
घरामध्ये व व्यापारामध्ये आर्थिक स्थैर्यासाठी स्फटिकाच्या झाडाचा उपयोग होतो. स्फटिकामुळे मानसिक शक्ती वाढते. कोणत्याही समस्या सोडविताना सकारात्मक दृष्टीचा वापर करणे यामुळे सहज सोपे होते. व्यापारात वाटाघाटी यशस्वी होण्यास हे झाड अत्यंत उपयुक्त आहे. वेगवेगळ्या रंगाचे स्फटिकाचे झाड घरामध्ये ठेवणे लाभदायक ठरते.

फेंगशुई ड्रॅगन घरात कुठे ठेवल्यास लाभ होतो?
ड्रॅगन हा उत्तम यांग ऊर्जेचा प्रतीक आहे. ड्रॅगनची प्रतिकृती घरात किंवा कार्यालयात पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे या भागातील ऊर्जा अधिक क्रियाशील होते. पूर्व दिशा ही लाकूड तत्त्वाची दिशा आहे. त्यामुळे लाकूड, माती किंवा स्फटिकाने बनवलेल्या ड्रॅगनचा उपयोग करावा. अधिक यांग ऊर्जेची आवश्यकता असणार्‍या ठिकाणी म्हणजेच रेस्टॉरंट, दुकाने, स्टोअर्स इत्यादी ठिकाणी जेथे लोकांची ये-जा असते, तेथे पूर्व दिशेला ड्रॅगनची प्रतिकृती ठेवावी.

आम्ही हल्लीच फिशटँक घेतला आहे. परंतु कितीही स्वच्छता व काळजी घेतली तरी मासे मरत आहेत. याबाबत फेंगशुईनुसार दोष असू शकतात का?
घरात फिशटँक ठेवणे म्हणजे सद्भाग्यात वृद्धी करणे होय. मासे मरत असतील तर फेंगशुईनुसार जेव्हा एखादा मासा मरतो, तेव्हा तो आपल्या बरोबर अनेक दुर्भाग्य घेऊन जातो असे मानले जाते. घरातील एखाद्या सदस्यावर कोसळणारी आपत्ती तो मासा आपल्यावर घेतो अशी फेंगशुईत समज आहे. घरात हॉलमध्ये फिशटँक उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा.

बाथरूममध्ये वास्तुदोष असल्यास त्याचे निवारण कोणत्या उपायांनी करता येईल?
बाथरूममध्ये वास्तुदोष असल्यास बाथरूमच्या उंबरठ्याला लाल रंग द्यावा. बाथरूमच्या बाहेर चौकटीवर पा-कुआ मिरर लावावा. बाथरूममध्ये जाडे मीठ भरलेले दोन वाडगे जरूर ठेवावे. यामुळे बाथरूममधील वाईट ऊर्जा तेथेच शोषून घेते व घरात इतरत्र पसरत नाही. शक्यतो बाथरूमचा दरवाजा नेहमी बंदच ठेवावा.