क्रिकेटर झाले ऍक्टर : क्रिकेटचे फिल्मी कनेक्शन ...

क्रिकेटर झाले ऍक्टर : क्रिकेटचे फिल्मी कनेक्शन (Cricket and Filmi Connection : Cricketers Became Actors)

इंग्लंड संघाचा दौरा सुरू झाला आहे. क्रिकेटचा हंगाम शिगेला पोहचला आहे. मैदानावर क्रिकेटचा खेळ गाजवणारे खेळाडू चित्रसृष्टीत आले आहेत. क्रिकेट आणि चित्रसृष्टी यांचे नाते तसे जुने आहे. इरफान पठाण ‘कोबरा’ या तामिळ चित्रपटातून आपला फिल्मी डाव खेळण्यास तयार आहे. या चित्रपटाचा टिजर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला आहे. या चित्रपटात इरफान एका इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल.

क्रिकेटर इरफ़ान पठान

क्रिकेटर इरफ़ान पठान

विक्रमवीर सुनील गावस्कर क्रिकेटच्या मैदानात अतिशय फॉर्ममध्ये असताना चित्रपटात आला होता. त्याने ‘सावली प्रेमाची’ या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. तर १९८८ साली ‘मालामाल’ या हिंदी चित्रपटात कॅमिओ केला होता.

क्रिकेटर सुनील गावस्कर

अष्टपैलू कपिल देव देखील ‘इकबाल’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘स्टम्पड्‌’ या चित्रपटातून दिसला होता. कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्र्वचषक जिंकून इतिहास घडवला होता. त्याच्या पार्श्र्वभूमीवर आणि कपिलच्या जीवनावर आधारित ‘८३’ हा चित्रपट तयार होत आहे. त्यामध्ये रणवीर सिंह कपिलच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट तयार असून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

कपिल देव

कपिल देव

२० च्या दशकात हॅन्डसम अजय जडेजाचं माधुरी दीक्षितशी नाव जोडलं गेलं होतं. त्यांच्या कथित प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. पण मॅच फिक्सिंगमध्ये अजयचं नाव आल्याने, आपली बदनामी नको म्हणून माधुरीने त्याच्याशी संबंध तोडले. नंतर अजय २००३ साली आलेल्या खेल या चित्रपटात दिसला. चित्रपट फार काही चालला नाही.

क्रिकेटर अजय जडेजा

क्रिकेटर अजय जडेजा

क्रिकेट विश्र्वात अत्युच्च शिखरावर गेलेल्या सचिन तेंडुलकरांना बॉलिवूडने आपल्याकडे खेचून घेतलेच. २०१७ साली त्याच्या जीवनावर आधारित ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट आला होता. त्यामध्ये त्याच्या संघर्षमय जीवनाचे काही क्षण, मुंबईमधील त्याच्या जीवनातील विशेष प्रसंग आणि अंजलीशी झोलेले लग्न यांचे चित्रण दाखविले होते.                            

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

सचिनचा मित्र आणि क्रिकेटर विनोद कांबळी याने देखील चित्रसृष्टीत आपलं नशीब आजमावलं आहे. २००० साली विनोदने ‘अनर्थ’ या चित्रपटात क्रिकेटवेड्या सुनील शेट्टीबरोबर काम केलं. पण चित्रपट काही चालला नाही.

क्रिकेटर विनोद कांबळी

क्रिकेटर विनोद कांबळी

सलील अंकोलाची क्रिकेट कारकीर्द अगदी खूप गाजली नव्हती. पण त्याने टी.व्ही. कार्यक्रमात त्यामानाने बरे नाव कमावले. ‘चाहत और नफरत’ या कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. तसेच ‘कुरुक्षेत्र’ आणि ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातही तो आला. ‘शू कोई है’ हा सलीलचा हॉरर शो बऱ्यापैकी लोकप्रिय ठरला होता.

सलिल अंकोला

सलिल अंकोला

युवराज सिंगचे पिताजी व माजी क्रिकेटपटू योगराज सिंग हे पंजाबी चित्रपटात काम करतात. त्यांनी ३०हून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तर १० हिंदी चित्रपटात देखील ते दिसले आहेत. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील त्यांची प्रशिक्षकाची भूमिका चांगलीच गाजली होती.

क्रिकेटर योगराज सिंह

क्रिकेटर योगराज सिंह

बॉलिवूडच्या ग्लॅमरचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यातून क्रिकेटवीर देखील सुटलेले नाहीत. म्हणूनच बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते बरेच जुने आणि मजबूत आहे.