करोना अलर्ट : रोगप्रतिकारशक्ती कमी आहे हे दर्शव...

करोना अलर्ट : रोगप्रतिकारशक्ती कमी आहे हे दर्शविणारी ११ लक्षणं आणि ती वाढविण्यासाठी उपाय (Covid Alert : Take This Immunity Test, Know These 11 Signs And boost your Immunity)

करोना दरम्यान सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरत असलेली बाब म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती. करोनावर मात करण्यासाठी वा याचा संसर्ग होऊ नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, असे वारंवार सांगितले जात आहे. करोनाचं वाढतं प्रस्थ पाहता लोकंही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबाबत जागरूक झाले आहेत. परंतु रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याआधी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित आहे की नाही, हे जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी खाली दिलेली लक्षणं तपासून बघा. 

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याची लक्षणं

 • तुम्ही बऱ्याचदा आजारीच असता किंवा सारखे सारखे आजारी पडता.
 • तुम्हाला वारंवार अशक्तपणा जाणवत असेल तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे.
 • हवामान बदलानुसार काही जणांना सर्दी-पडसे आणि ताप येतो.
 • नेहमी थकवा जाणवणे हे कमजोर प्रतिकारशक्तीचं सर्वात मोठं लक्षण आहे. जास्त काम केल्यानंतर थकवा येणं सामान्य बाब आहे, परंतु काही न करता नेहमी थकवा जाणवत असेल तर आपल्या प्रतिकारशक्तीचं काम सुरळीत चालू नाही, असं समजावं.
 • कायम अंगदुखीचा त्रास असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमजोर आहे हे लक्षात घ्या.
 • सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटत नाही आणि संपूर्ण दिवसभर काम करण्यास उत्साह वाटत नाही.
 • रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना दुखापत झाल्यास जखम लवकर भरत नाही.
 • सांधेदुखी देखील कमजोर प्रतिकारशक्तीचं महत्त्वपूर्ण लक्षण आहे.
 • वर्षातून २-३ वेळा सर्दी, खोकला होणं हे सामान्य आहे. लहान मुलांना यापेक्षा जास्त वेळा सर्दी-खोकला होत असतो. परंतु मोठ्या व्यक्तींना वरचेवर सर्दी-खोकला आणि घसा दुखत असेल तर ते कमजोर प्रतिकारशक्तीचं लक्षण समजावे.
 • बद्धकोष्ठ, गॅस, पोटदुखी आणि पोट फुगणे अशा पोटासंबंधीच्या समस्या कायम सतावत असतील तर तुमची प्रतिकारशक्ती कमी होतेय हे लक्षात घ्या.
 • या व्यतिरिक्त नेहमी चिडचिड होणं, कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं ही रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याची लक्षणं असू शकतात.

अशी वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती

 • आठवड्यातून ३ दिवस टोमॅटोचा ज्यूस प्या.
 • लसूणही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
 • ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सी्डेंट असतात, त्यामुळे रोज ग्रीन टी प्या नि रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
 • रिकाम्या पोटी तुळशीची पानं खा.
 • अँटिऑक्सीडेंट आणि इन्फ्लेमिट्री अशा गुणांची हळद देखील रोगप्रतिकारकशक्ती वाढविते. गरम दुधामध्ये एक चमचा हळद घालून प्याल्यास फायदेशीर ठरते.
 • आलं, दालचिनी यांचा आहारात समावेश करा.
 • पुरेशी झोप घ्या.
 • जीवनशैलीत बदल करा. क्रियाशील जीवनशैली अवलंबा.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे नियमही पाळा

 • स्वच्छतेची काळजी घ्या.
 • तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
 • सकस आहार घ्या.
 • खूप पाणी प्या.
 • जंक फू्‌ड खाऊ नका.
 • धूम्रपान आणि मद्यपान करू नका.