करोना व्हायरसपासून संरक्षण करण्याचे घरगुती उपाय...

करोना व्हायरसपासून संरक्षण करण्याचे घरगुती उपाय (COVID-19 Home Remedies: How To Avoid Coronavirus)

करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायजरचा वापर करणे अतिशय गरजेचे आहेच. यासोबत काही घरगुती उपाय करूनही आपण करोना व्हायरसपासून आपलं संरक्षण करू शकतो.

संपूर्ण देशात करोनाने दहशत निर्माण केली आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. हॉस्पिटल्समध्ये जागा नाही, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गैरव्यवहाराचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला करोनापासून सुरक्षित ठेवण्याकरिता प्रत्येकाने घरच्या घरीच काही उपाय केले पाहिजेत. आम्ही तुम्हाला असे १० उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतःला, तसेच कुटुंबियांना करोनापासून सुरक्षित ठेवू शकता.

कोविड-१९ पासून घरच्या घरी संरक्षण मिळवण्यासाठी

  • क जीवनसत्त्व असलेली फळं जसे संत्र, मोसंबी, लिंबू, आवळा इत्यादीचं नियमित सेवन करा.
  • दररोज नियमितपणे योग, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करा. यामुळे श्वसनक्रिया आणि फुप्फुसं मजबूत होतील. यासोबतच रोज १ तास सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसा.
  • कापूर, लवंग, वेलची आणि दालचिनी यांची पूड करून आपल्या सोबत ठेवा आणि वेळोवेळी हे मिश्रण सुंघत राहा.
  • शिळं अन्न खाऊ नका. ताजं आणि गरम जेवण जेवा.
  • फ्रिजमधील पाणी न पिता गरम पाणी प्या.
  • आरोग्यास नुकसान पोहचवणारे बाजारातील विकतचे वा उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत.
  • दिवसातून दोन वेळा वाफ घ्या. नाक आणि तोंडावाटे वाफ आत जाऊ द्या. यामुळे विषाणू फुप्फुसापर्यंत जाऊ शकणार नाहीत.
  • कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या करा. यामुळे आपण विषाणूला फुप्फुसापर्यंत जाण्यापासून रोखू शकतो.
  • तुळस, लवंग, आलं आणि हळदीचं दूध प्या.
  •  रोज हर्बल टी प्या. हर्बल टी बनवण्यासाठी १ लीटर पाण्यामध्ये काही तुळशीची पानं घालून चांगलं उकळवा. पाणी एक चर्तुथ्यांश भाग होईपर्यंत उकळलं की त्यात एक चिमूट काळी मिरी पावडर, थोडा गुळ आणि एक चमचा लिंबाचा रस घालून उकळवा. ही हर्बल टी दिवसातून एक ते दोन वेळा प्या.