कोरोना व्हायरस केयर टिप्स (...

कोरोना व्हायरस केयर टिप्स (Corona Virus – Care Tips)

* हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,
कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात

* मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,
सगळ्यांनी मास्क घालूनच पडा घराबाहेर

* शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग राखून

* शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

* ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षणं दिसली कोरोनाची, तर डॉक्टरांना भेटा थेट

* काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

* चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,
आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ

* चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,
काळजी घ्या, सुरक्षित राहा…