कोरोना व्हायरस केयर टिप्स (Corona Virus Care Tips)

कोरोना व्हायरस केयर टिप्स (Corona Virus Care Tips)

हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,
कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात
मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,
सगळ्यांनी मास्क घालूनच पडा घराबाहेर
शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग राखून
शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा
ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षणं दिसली कोरोनाची, तर डॉक्टरांना भेटा थेट
काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले
चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,
आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ
चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,
काळजी घ्या, सुरक्षित राहा…