राखी सावंतला करोनाची भिती? पीपीई किट घालून गेली...

राखी सावंतला करोनाची भिती? पीपीई किट घालून गेली भाजी बाजारात (Corona Scare: Rakhi Sawant Wears PPE Kit And Goes to Market For Vegetable Shopping)

झगमगत्या दुनियेतील सुप्रसिद्ध आयटम गर्ल आणि ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी काही ना काही कारणाने प्रकाशझोतात येत असते. टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत लोकांचे भरपूर मनोरंजन करणारी राखी आपल्या खऱ्या आयुष्यातही लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेल्या राखीचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत आणि आपले चाहते निराश होऊ नयेत यासाठी ती वरचेवर आपले फोटो आणि व्हिडिओज्‌ शेअर करत असते. आताही सर्वत्र करोनाच्या संसर्गामुळे भयावह परिस्थिती असताना तिने पीपीई किट घालून भाजी खरेदी करतानाचे आपले फोटो सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहेत, जे फारच वेगाने व्हायरल होत आहेत.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

सध्या पूर्ण देशामध्ये करोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट आलेली आहे. दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि हे प्रमाण कमी व्हावं यासाठी लॉकडाउन करण्यात आलेला आहे. प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा आहे. अशातच अनोख्या आणि हटके शैलीत दिसणाऱ्या राखीनं चक्क पीपीई किट परिधान केलेला दिसला. पीपीई किट वापरून भाजी खरेदी करताना ती दिसत आहे. पीपीटी किट परिधान केलेल्या अवतारात राखी प्रचंड क्यूट दिसत आहे. एकीकडे करोनाच्या भितीपोटी पीपीटी किट घालणारी राखी, भाजी घेता घेता मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर स्वतःच्या तोंडावरील मास्क बाजूला करत पोझ द्यायला मात्र बिलकूल विसरली नाही.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

राखी वेगवेगळ्या भाजीवाल्यांकडे जाऊन भाज्यांचे दर विचारत भाज्या घेत होती. शिवाय तेथील भाजीवाल्यांना मास्क घालण्याच्या सूचना देत होती. हे सर्व फोटो राखीने सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर चाहत्यांकडून तिचे फारच कौतुक होत आहे. मात्र कोरोना परिस्थिती बघता आपल्याला असं करावं लागणार असल्याचं ती म्हणाली. तर आपण काही किट्सचं गरजू लोकांना वाटप केल्याचंही राखीनं सांगितलं.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

या आधी राखी आपल्या कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या सलमान आणि सोहेल खानचे आभार मानताना दिसली होती. आताही तिने सर्व चाहत्यांना करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.