अक्षयकुमारचे औदार्य : करोना बाधितांसाठी गौतम ग...

अक्षयकुमारचे औदार्य : करोना बाधितांसाठी गौतम गंभीर फाऊंडेशनला १ कोटी दिले (Corona Crisis: Akshay Kumar Donates Rs 1 Crore To Gautam Gambhir Foundation To Help Covid Victims)

देशसेवेसाठी काही करायचं म्हटलं की अक्षय कुमार सदैव तत्पर असतो. आता जेव्हा देशात करोनाची महाभयंकर अशी दुसरी लाट आली आहे आणि देशाला खरोखर मदतीची निकड आहे अशा वेळीही खिलाडी अक्षयकुमारने गौतम गंभीरच्या संस्थेला १ कोटी दिले आहेत. ही माहिती गंभीरने ट्वीट करून दिली आहे.

गंभीरने लिहिलंय, यावेळी मिळणारी प्रत्येक मदत ही आशेचा किरण बनून येत आहे. जीजीएफ संस्थेला एक करोडची मदत केल्याबद्दल गौतमने अक्षय कुमारचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच तुझ्या मदतीमुळे गरजवंताना जेवण, औषधं आणि ऑक्सिजन मिळेल. देव तुझे भले करो, असंही त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

अक्षयने देखील गौतमच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलंय, खरोखर अतिशय कठिण परिस्थिती आहे. मी मदत करू शकलो, याबद्दल मला समाधान आहे. आपण सर्व जण लवकरच या परिस्थितीतून बाहेर येऊ, अशी मी प्रार्थना करतो. सुरक्षित राहा.

आपण पाहिलंय्‌ अक्षय कुमारने प्रत्येक संकटकाळी देशाला संभाव्य मदत केली आहे. म्हणूनच गौतम आणि अक्षयच्या या कार्याचे सगळ्यांकडून स्वागत केले जात आहे. त्यांना खरे हिरो म्हटले जात आहे. समाजातील इतरही सक्षम लोकांनी मदतीसाठी पुढे यावे, असं त्यांचं कळकळीचं सांगणं आहे.