‘टाइमपास 3’ वादाच्या कचाट्यात (Controversy Over...

‘टाइमपास 3’ वादाच्या कचाट्यात (Controversy Over A Scene In ‘Time Pass 3’: Demand To Delete It)

अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचे सलग दोन शुक्रवारी अनन्या आणि टाइमपास 3 हे चित्रपट प्रदर्शित झाले. टाइमपास आणि टाइमपास 2 च्या यशानंतर टाइमपास 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात ह्रता आणि प्रथमेश परब ही नवी जोडी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना जरी हा चित्रपट खूप आवडला असला तरी तो सध्या वादाच्या कचाट्यात सापडला आहे.


गेल्या शुक्रवारी रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास 3 चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने पालवी ही भूमिका साकारली होती. तर प्रथमेश परब दगडूच्याच भूमिकेत दिसला. पण या चित्रपटातील एका सीनमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे म्हटले आहे. त्यामुळे चित्रपटात खोटी माहिती दाखवल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केली आहे. तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या अफवा पसरवणे हा गुन्हा असून सिनेमातून तो करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेमातील ती दृश्य तातडीनं काढून टाकावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
अजूनपर्यंत या चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.