वडीलांवर चोरीचा आळ ते घरातून हाकलली जाईपर्यंत.....

वडीलांवर चोरीचा आळ ते घरातून हाकलली जाईपर्यंत.. जाणूया अमिषा पटेलच्या वादग्रस्त आयुष्यात काय घडले..(Controversies Related to Bollywood Actress Ameesha Patel’s Life)

बॉलिवूडमध्ये सगळ्यांना पदार्पणातच यश मिळेल असे नाही, काहींना त्यासाठी कित्येक वर्षे वाट पहावी लागते तर काहीजण पहिल्याच चित्रपटामुळे स्टार बनतात. अभिनेत्री अमिषा पटेलही तिच्या पहिल्याच चित्रपटामुळे स्टार बनली होती. ‘कहो ना प्यार है’ सारखा सुपरहिट चित्रपट करियरच्या पहिल्याच टप्प्यात पदरी पडल्यामुळे अमिषाच्या सर्वत्र चर्चा होत होत्या. मुलीचे यश पाहून अमिषाचे आईवडील सुद्धा खूप खूश होते. पण कालांतराने अमिषाच्या चढत्या आलेखाला उतरती कळा लागली. तसे पहायला गेल्यास अमिषा तिच्या प्रोफेशन लाइफपेक्षा वैयक्तिक आय़ुष्यासाठी जास्त चर्चेत होती. आज आपण तिच्या आय़ुष्याशी संबंधित काही वाद जाणून घेणार आहोत.

असे म्हटले जाते की, अमिषाला तिचा पहिला चित्रपट तिच्या वडीलांमुळेच मिळाला होता. त्यानंतर तिला गदर आणि हमराजसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. लागोपाठ सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे तिचे नाव यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतले जाऊ लागले. त्यावेळचे तिचे काम पाहून ही पुढे जाऊऩ आणखी यशस्वी अभिनेत्री बनेल असेच सगळ्यांना वाटू लागले. पण कालांतराने तिचे नाव चित्रपटांपेक्षा वैयक्तिक वादविवादांमुळे जास्त चर्चिले गेले.

करियरमध्ये 40 हून अधिक चित्रपटांत काम करणाऱ्या अमिषाचे नाव दिवसेंदिवस नाहीसे होऊ लागले होते. अमिषा इकॉनॉमिक्स विषयात गोल्ड मेडलिस्ट होती. एक दिवस अचानक अमिषाने तिच्या वडीलांवरच करोडो रुपयांच्या चोरीचा आरोप केला. एवढेच नाही तर तिने तिच्या वडीलांना लिगल नोटीसदेखील पाठवली. अमिषाने तिच्या वडीलांनी तिचे १२ करोड रुपये चोरून तिच्या अकाउंटचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या वादविवादांचा परिणाम तिच्या करियरवर झाला व हळूहळू ते डबघाईस जाऊ लागले.

मध्यंतरी अमिषा आणि विक्रम भट्ट यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा होत होत्या. त्या दोघांनी ५ वर्षे एकमेकांना डेट केल्याचे बोलले जाते. पण त्यांच्या घरच्यांकडून या नात्याला विरोध होता. त्यावेळी अमिषाची आई तिच्यावर खूप नाराज होती. तिने अक्षरश: चपलेने मारत अमिषाला घराबाहेर काढले होते. त्यानंतर कित्येक वर्ष अमिषाने तिच्या घरच्यांशी संबंध तोडला होता. पण आता त्यांच्यात समेट झाल्याचे म्हटले जाते.

गेली कित्येक वर्षे अमिषा प्रमुख अभिनेत्री म्हणून कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. पण तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकल्यावर समजते की ती सध्या वेगवेगळ्या ठिकाणी शो करत असते. उद्घाटन समारंभाना उपस्थिती लावते. तसेच छोट्या मोठ्या इव्हेंटला जाऊन पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असते.

अमिषाच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच आपल्याला तिचा सुपरहिट चित्रपट गदरच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाली असून वर्षाअखेरीस चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट त्याच्या पहिल्या पार्टप्रमाणे बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावण्यात यशस्वी ठरेल अशी आशा आहे. जेणेकरुन अमिषाच्या करियरची भरकटलेली गाडी पुन्हा रुळावर येईल. 

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम.