शाहरूख खानची जिंदगी : एक वादळवाट… त्याच्या जीवन...

शाहरूख खानची जिंदगी : एक वादळवाट… त्याच्या जीवनातील वादग्रस्त प्रकरणे (Controversies In The Life Of Shah Rukh Khan)

शाहरूख खानचा तरुण मुलगा आर्यन अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकला आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. परंतु त्याला दिलासा मिळाला नाही. त्याच्या जामीनास चौथ्यांदा नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन अद्याप तुरुंगातच राहणार आहे. परिणामी शाहरूख खानची जिंदगी म्हणजे एक वादळवाट ठरली आहे. त्याच्या जीवनात यापूर्वी अशीच वादग्रस्त प्रकरणे रंगली आहेत.

२०२१ साली आयपीएल क्रिकेट मॅचमध्ये शाहरूखने वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षारक्षकास शिवीगाळ केली होती. त्याच्या तक्रारीवरून शाहरूखला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती.

या आधी, २००९ साली अमेरिकेतील विमानतळावर, सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले होते. शाहरूखने तिथे वाद घातला. तेव्हा त्याचा मोबाईल फोन काढून घेण्यात आला होता. अन्‌ कपडे काढून झडती घेण्यात आली होती.

आर्यन आणि सुहाना ही दोन मुले असताना शाहरूख आणि गौरी खानने आपल्या तिसऱ्या मुलासाठी आयव्हीएफ – सरोगसी तंत्राचा वापर केला होता. त्यामुळे २०१३ साली अबराम या त्यांच्या तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला. शाहरूखची ही कृती चांगलीच वादग्रस्त ठरली होती.

शाहरूख खानचे, प्रियंका चोप्राशी अनेकदा नाव जोडले गेले होते. या दोघांच्या छुप्या प्रेमप्रकरणाच्या वार्ता एवढ्या रंगल्या होत्या की गौरी व त्याच्यात बेबनाव होणार अशीही वावडी उठली होती.

२००८ साली शाहरूखने सलमान खानशी पंगा घेतला होता. कतरिना कैफच्या बर्थ डे पार्टीत शाहरूखने सलमानची माजी प्रेयसी ऐश्वर्या रायवर शेरे मारले. तेव्हा सलमानला गुस्सा आला. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती.

आमीर खानने शाहरूखला खालच्या पातळीवर आणले होते. त्याने ट्वीट केले होते की, शाहरूख माझे पाय चाटतो. तो माझ्या घराचा राखणदार आहे. नंतर मग त्याने खुलासा केला की, शाहरूख हे माझ्या कुत्र्याचे नाव आहे.

पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य हा शाहरूखचा आवाज मानला जात होता. कारण पडद्यावरची शाहरूखच्या तोंडी असलेली जवळपास सर्वच गाणी अभिजीतने गायली आहेत. म्हणजे दोघांचे संबंध तसे चांगले होते. पण अचानक काय घडले कोणास ठाऊक? ‘मै हुं ना’ या आपल्या चित्रपटाच्या नामावलीत शाहरूखने अभिजीतचे नावच टाकले नाही. अभिजीतने दुःखी होऊन एका मुलाखतीत म्हटले की, “शाहरूखने या चित्रपटाचा स्पॉटबॉय पासून सर्वच तंत्रज्ञांना श्रेय दिले. पण मी त्यांचा गायक असूनही माझे नाव वगळले. ‘ओम शांती ओम्‌’ चित्रपटात हेच घडले. मी त्याला उसना आवाज दिला, पण त्याने मला श्रेय दिले नाही. यामुळे मी फारच दुखावलो गेलो….”

शाहरूखला सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. एका क्रिकेट मॅचप्रसंगी तो जयपूरच्या स्टेडियममध्ये, खुलेआम सिगारेट ओढताना लोकांनी पाहिले. तेव्हा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केले म्हणून शाहरूख विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती.