बिग बॉसच्या घरात मोठाच राडा… कॅप्टन पदासा...

बिग बॉसच्या घरात मोठाच राडा… कॅप्टन पदासाठी मारामारी आणि झोंबाझोंबी… (Contestants Hit And Topple Each Other For Captaincy In Big Boss House)

सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणाऱ्या ‘बिग बॉस मराठी ३’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. स्पर्धकांचे या घरातील दिवस जसजसे कमी होत आहेत. तशतशी टास्क बघण्यात मजा येत आहे. प्रेक्षकही हा शो समरसून बघत असून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देताना दिसताहेत.

Big Boss Marathi, Captaincy fight
Big Boss Marathi, Captaincy fight

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शेवटचे कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. यात “जो जिता वही सिकंदर” असा निकाल लागणार आहे. या कॅप्टन्सी कार्यासाठी पात्र सदस्यांसोबतच अपात्र सदस्यांना देखील उमेदावरी मिळत असल्याचे कालच बिग बॉस यांनी जाहीर केले आहे. आता शेवटच्या कॅप्टन्सी कार्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठाच राडा… मारामारी अन्‌ झोंबाझोंबी होणार हे नक्की.

Big Boss Marathi, Captaincy fight
Big Boss Marathi, Captaincy fight

टास्क म्हटलं म्हणजे राडा, वादावादी ही होणारच. घरात आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर स्पर्धकांना जिंकू किंवा मरू यापद्धतीनेच खेळावे लागणार आहे. कॅप्टन्सीच्या या खेळात जय VS विशाल तर गायत्री VS मीरा बघायला मिळणार आहे. तर इतर सदस्य देखील एकमेकांच्या विरोधात खेळणारच आहेत. यामध्ये कोण विजयी ठरणार हे पाहण्यास तुम्ही उत्सुक असणार. खरं सांगायचं तर, ‘बिग बॉस मराठी ३’ घरात खेळले जाणारे टास्क आणि त्यादरम्यान होणारी सदस्यांची भांडणं पाहूनच प्रेक्षक मराठी बिग बॉसच्या घराचा एक सदस्य बनले आहेत.