बिग बॉसकडे खाण्यापिण्याची मागणी (Contestants De...

बिग बॉसकडे खाण्यापिण्याची मागणी (Contestants Demand Food Items To Big Boss)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्पर्धंकांना दोन आठवडे झालेत. मजा मस्ती, भांडणं यात दिवस कसे भरकन्‌ गेल्यासारखे वाटतात. या दरम्यान स्पर्धकांत बराच बिनधास्तपणा येऊ लागला आहे असं वाटतंय. बिग बॉसच्या घरात राहून त्यांनाच आदेश देण्यापर्यंत स्पर्धकांची मजल गेली आहे. ‘बिग बॉस आदेश देत आहेत… बिग बॉस सांगू इच्छितात…’ असे आपण ऐकतो. पण जयने थेट बिग बॉसनाच आदेश दिला आहे. खरं म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये काही गोष्टी सदस्यांना दिल्या जातात आणि काही गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागते. कधी कधी बिग बॉस त्यांना या गोष्टी मिळविण्याची संधी देखील देतात. पण जयने न राहून बिग बॉस यांनाच ऑर्डर दिली आहे. ऑर्डरही कसली तर… “बिग बॉस तुम्ही आमच्यावर प्रेम करत असाल तर माझ्यासाठी एक लोणच्याची बाटली पाठवून द्या…” म्हणे.

Big Boss marathi

जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच डायनिंग टेबलवर बसून जेवणाचा आनंद घेत आहेत. पैकी कोणाला चाईनीज खायचं आहे तर कोणाला लोणचं तर कोणाला वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राइस खायचा आहे, कोणाला चिकन हवंय तर कोणाला मंचुरियन आणि कोणाला पनीर चिली. यांच्या जिभेचे चोचले पाहून तरी असं वाटतंय की हे सदस्य आपण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहोत, रेस्टोरंटमध्ये नाही, हे विसरलेले दिसताहेत. जयचं तर काय, अजून जास्त प्रेम करत असाल तर लस्सी पाठवा, अशीही मागणी तो करतोय.

Big Boss marathi

यावर तृप्तीताईंनी मात्र त्यांना वास्तवाचं भान दिलंय. त्या म्हणाल्या “सारखं आपलं तुम्ही आमच्यावर प्रेम करत असाल तर हे पाठवून द्या, ते पाठवून द्या…” त्यानंतर गायत्री म्हणाली, “त्यांच्या ठरलेल्या गोष्टींपैकी ते पाठवतील. ते प्रेम असेल म्हणून वगैरे बाकी काही नवीन पाठवणार नाहीत.” असो. घरापासून लांब राहत असलेल्या स्पर्धकांना बिग बॉसच आता मायबापासारखे आहेत, म्हटल्यावर ते तरी कोणाकडे खाण्यापिण्याची मागणी करणार, नाही का? आपण फक्त बघायचं की बिग बॉस त्यांच्या आदेशाचं पालन करतात की त्यांना …?