बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी पाळणा हल...

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी पाळणा हलला… अभिनेत्रीला झाले कन्यारत्न (Congratulations! Bipasha Basu And Karan Singh Grover Blessed With A Baby Girl)

लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. करण आणि बिपाशा यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते.

लग्नाच्या 6 वर्षानंतर बिपाशा बसू आई झाली, अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या घरात लग्नाच्या 6 वर्षांनंतर पाळणा हलला. 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले. करण आणि बिपाशाने काही महिन्यांपूर्वीच आपण आई बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. बिपाशाने आपले गरोदरपण खूप एन्जॉय केले.

बिपाशा अनेकदा आपल्या बेबी बंपचा व्हिडीओ शेअर करायची. गरोदरपणाच्या काळातही बिपाशाने आपला लूक खूप स्टाइलिश ठेवला होता. तिचे सगळे लूक चाहत्यांना खूप आवडले. गरोदरपणातही तिचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता.

बिपाशाला तिच्या गरोदरपणातील बोल्डनेससाठी खूप ट्रोल केले गेले. पण त्याचा बिपाशावर काहीच फरक पडला नाही.  तिने अनेक बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत आणि आता ती बॉलिवूडची सर्वात हॉट आई बनली आहे असे म्हटल्यास हरकत नाही.