फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अडकले लग्नाच्या ...

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अडकले लग्नाच्या बंधनात (Congratulation! Wedding Photos of Bollywood Actor Farhan Akhtar and Model Shibani Dandekar)

चार वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी आज १९ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे पहिले फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये फरहान काळ्या रंगाचा कोट-पँट घातलेला आहे, तर शिबानी लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसते आहे. फोटोमध्ये उभयता खूपच आनंदी दिसत आहेत.

खंडाळा येथील शबाना आझमी यांच्या फार्म हाऊसवर हे लग्न पार पडलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले नाही किंवा निकाह देखील केला नाही. तर फरहान आणि शिबानी यांनी एकमेकांना अंगठी घालून सात जन्म एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली आहे.

लग्नानंतर लगेचच फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने सर्व पाहुण्यांसमोर फरहानचा हिट चित्रपट ‘दिल चाहता है’च्या गाण्यावर डान्स केला. फरहान आणि शिबानीच्या लग्नाला बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशननेही हजेरी लावली होती. हृतिकसोबत त्याची बहीण पिंकी आणि वडील राकेश रोशनही होते.

या लग्नाला हृतिक रोशनशिवाय बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, रितेश सिधवानी, मोनिका डोग्रा, गौरव कपूर, समीर कोचर, मीयांग चांग आणि जुही चावला यांचा समावेश आहे.