गुड न्यूज तैमूर बिग बी झाला.. करीनाला मुलगा झाल...

गुड न्यूज तैमूर बिग बी झाला.. करीनाला मुलगा झाला… (Congratulation-Kareena And Saif Blessed With A Baby Boy..)

बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर करीना कपूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काल रात्री करीनाला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. आज सकाळी तिने एका छानशा बाळाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. बाळाचे बाबा आणि मोठा भाऊ अर्थात तैमूर आपल्या घरी नव्याने आलेल्या या बाळाच्या स्वागतासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. कपूर आणि पटौदी कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना ही आनंदाची बातमी देत आहेत.
२०१२ साली करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे लग्न झालं होतं. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर करीनाने तैमूरला जन्म दिला. तैमूरच्या नावावरून जरी त्यावेळी वाद निर्माण झाला असला तरी हळूहळू मीडिया आणि सगळ्यांनीच तैमूरला भरभरून प्रेम दिले. तैमूर लहानग्या वयातच सेलिब्रेटी झाला. करीनापेक्षाही तो अधिक लोकप्रिय झाला आहे, असे गमतीत म्हटले गेले. तैमूरनंतर बरोबर चार वर्षांनी करीना दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने मुलाला जन्म दिला आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर दोघांचही खूप खूप अभिनंदन!