कॉमेडी क्विन भारती सिंग या वादांच्या भोवऱ्यात अ...

कॉमेडी क्विन भारती सिंग या वादांच्या भोवऱ्यात अडकली आहे (Comedy Queen Bharti Singh Is Trapped in These Big Controversies, You Will Also be Surprised to Know)

आपल्या हुशारीने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारी भारती सिंग सर्वांच्या मनावर राज्य करते. भारतीच्या कॉमेडीवर, प्रेक्षक हसतात आणि आपले सर्व दुःख विसरतात. आपल्या विनोदाने सगळ्यांचे टेन्शन हलके करणारी भारती अनेकदा वेगवेगळ्या वादांमध्ये अडकली आहे. नुकतेच एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध २०० पानी आरोपपत्र दाखल केले. 2020 मध्ये भारती आणि हर्ष यांना NCB ने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती, त्यानंतर दोघेही जामिनावर बाहेर आले होते.

ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालणार आहे. ड्रग्ज व्यतिरिक्तही भारती आणखी काही वादांत अडकली होती.

मध्यंतरी भारतीला शीख समुदायावर विनोद करणे खूप महागात पडले होते.  भारतीने एका शोमध्ये दाढी-मिशीवरुन खिल्ली उडवली होती. त्यानंतर शीख समुदायाने तिच्यावर राग काढत तिला तीव्र विरोध केला.

या घटनेनंतर अमृतसरच्या शीख संघटनांनीही भारती विरोधात निदर्शने केली. एवढेच नाही तर तिच्यावर पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. शीख समुदायाचा आक्रोश पाहून भारतीने नंतर त्यांची जाहीरपणे माफी मागून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे सांगितले.

 एकदा कॉमेडियन सिद्धार्थ सागरने भारती सिंगला सगळ्यांसमोर कानाखाली मारली होती. भारती ‘कॉमेडी नाईट्स लाइव्ह’ करत असताना ही घटना घडली होती. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते.

याशिवाय भारतीने एकदा फराह खानच्या शोमध्ये ख्रिश्चन धर्माच्या एका शब्दाची खिल्ली उडवली होती, त्यामुळे ख्रिश्चन समुदायाचे लोक भारतीवर खूप नाराज झाले होते.

वादांच्या भोवऱ्यात अडकलेली भारती आपल्या विनोदांनी कित्येक कोटींची कमाई करते. मिळालेल्या माहितीनुसार भारतीची एकूण संपत्ती 223 कोटी रुपये आहे. कोट्यावधींची कमाई करणाऱ्या भारतीकडे आलिशान घर आणि अनेक महागड्या गाड्या आहेत.