अलिशान घर आणि अनेक महागड्या कारचा मालक आहे कपिल...

अलिशान घर आणि अनेक महागड्या कारचा मालक आहे कपिल शर्मा, जाणून घ्या किती आहे मालमत्ता (Comedy King Kapil Sharma is the Owner of Luxurious House and Cars, You Will be Stunned to Know His Property and Net Worth)

कॉमेडी किंग कपिल शर्मा आपल्या द कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनसह प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच कपिलच्या नवीन लूकचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा नवा लूक त्याने आपल्या शोच्या नव्या सीझनसाठी केल्याचे म्हटले जाते. कपिल शर्मा सध्याचा आघाडीचा विनोदी कलाकार आहे. पण त्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यानेसुद्धा आयुष्यात अनेक कष्ट केले आहेत. कपिलने १५ वर्षांच्या करीअरमध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली. खरेतर त्याचे यश हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे. सध्याच्या घडीला कपिल अलिशान गाड्या आणि घराचा मालक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा जवळपास 276 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मुंबईसारख्या ठिकाणी त्याचा अलिशान बंगला आणि अनेक महागड्या गाड्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कपिल शर्माने इंडस्ट्रीत इतकी प्रसिद्धी मिळवली आहे की त्याला आता श्रीमंतीच्या थाटात राहायला आवडते.

कपिलचा जन्म पंजाबमध्ये झाला. गेली १५ वर्षे तो मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. करीअरच्या सुरुवातीला त्याला अनेकांनी काम देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तेव्हा त्याला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता.

बर्‍याच वेळा नकारांचा सामना केल्यानंतर कपिल शर्मा’लाफ्टर चॅलेंज 3′ या शोचा विजेता ठरला आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘लाफ्टर चॅलेंज 3’ हा शो जिंकल्यावर त्याला १० लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. त्या रक्कमेतून त्याने आपल्या बहिणीचे लग्न लावले. कपिल तब्बल ९ वेळा लाफ्टर चॅलेंजच्या वेगवेगळ्या सीझनचा विजेता ठरला होता.

कपिलच्या एकूण कमाई आणि मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, तो 276 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिल दरमहा ३ कोटी रुपये कमावतो. त्याची वार्षिक कमाई ३२ कोटी रुपये आहे. द कपिल शर्मा शोसाठी तो ७० ते ८० लाख रुपये फी घेतो. तसेच ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो कोटी रुपये कमावतो.

कपिलचे मुंबईत अलिशान अपार्टमेंट आहे. त्याची किंमत सुमारे ८ कोटी असल्याचे बोलले जाते. याशिवाय देशातील काही राज्यांमध्येही त्यांची मालमत्ता आहे. कपिल शर्माच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनेक आलिशान वाहने आहेत. कपिलच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ, इव्होक एसडी 4, व्होल्वो एक्ससी 90 सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे लक्झरी व्हॅनिटी व्हॅनही आहे.