कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झट...

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका ( Comedian Raju Srivastav Suffers A Heart Attack)

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिममध्ये व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुप्रसिद्ध कॉमेडियन म्हणून राजू श्रीवास्तव यांना ओळखले जाते.

राजू यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे, तसेच त्यांनी अनेक कॉमेडी शोमध्येही काम केले आहे. राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवर वर्कआऊट करत होते. त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराने सांगितले की, ते रात्री १२ वाजता दिल्लीतील जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध पडले होते.

त्यानंतर त्यांना एम्स रूग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठिक असून, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.राजू श्रीवास्तव यांच्या सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांना हृदय विकाराचा झटका आला हे समजताच अनेकांना मोठा धक्का बसला असून, ते लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.