कॉमेडियन भारती सिंहने प्रदर्शित केली हॉट छायाचि...

कॉमेडियन भारती सिंहने प्रदर्शित केली हॉट छायाचित्रे (Comedian Bharti Singh set fire on the Internet with her latest hot Photoshoot, Pics goes Viral)

टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आपल्या हजरजबाबी संवादांमुळे लोकांची फार आवडती आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटो व मजेदार व्हिडिओज्‌ प्रदर्शित करत असते. पण आता तिने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड फोटोज्‌ टाकून चाहत्यांना अचंबित केलं आहे. यामध्ये भारती चांगलीच ग्लॅमरस दिसून येत आहे. रेड कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घालून आणि त्याला शोभेसा मेकअप्‌ करून बऱ्यापैकी सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये भारतीने लाल बांगड्या घातल्या आहेत. तिच्या या मोहक पोज्‌वर चाहते फिदा होत आहेत.

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती चांगलीच हॉट दिसते आहे. तिच्या या धिटाईने इंटरनेटचे वातावरण तप्त झाले आहे.

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

एका छायाचित्रात या कॉमेडी क्वीनने डोळे बंद करून चाहत्यांना विचारात पाडले आहे.

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

या छायाचित्रात भारतीने आपल्या नेत्रकटाक्षाने चाहत्यांना मदहोश केले आहे. तिचे हे फोटो पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

भारतीचे हे लेटेस्ट फोटो शूट पाहून चाहते लाइक्स आणि कमेंट्‌स देऊन तिची तारीफ करीत आहेत. इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांचा आकडा ४ कोटींपेक्षा जास्त झाला आहे. त्याबद्दल तिने खास पोज देऊन चाहत्यांना धन्यवाद दिले होते.

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

‘इंडियन आयडॉल १२’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंह व तिचे पती यांनी केले होते. यजमान आदित्य नारायण मागच्या आठवड्यातील कार्यक्रमात दिसला नव्हता. आदित्यच्या जागी भारती व हर्ष यांना पाहून चाहत्यांच्या मनात शंका आल्या की, आदित्यने हा कार्यक्रम सोडला तर नाही ना?

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य– इन्स्टाग्राम

यावर आदित्यने एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केले की, मी आजारी होतो म्हणून या कार्यक्रमात आलो नव्हतो. या आठवड्यात आपण परत येणार आहोत, असे तो म्हणतो. त्याने आपले मित्र भारती व हर्ष लिंबाचिया यांनी आपल्या गैरहजेरीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.