लाल रंगाचा ड्रेस घालून लाफ्टर क्विन भारती सिंहन...

लाल रंगाचा ड्रेस घालून लाफ्टर क्विन भारती सिंहने फ्लॉन्ट केला बेबी बंप अन् चाहत्यांना विचारलं, सँटा येणार की सँटी?’ (Comedian Bharti Singh Flaunts Her Baby Bump, Asks Fans ‘Santa Aaega Ya Santi’?)

टेलिव्हिजनवरील पहिली लाफ्टर क्वीन (Comedian) म्हणून भारती सिंह (Bharti Singh) अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. सध्या ती आपल्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहे. नुकताच भारतीने ख्रिसमसच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे.

भारती सिंह ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. नुकतंच तिने तिचा आणि हर्षचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात ती बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावेळी त्या दोघांनीही लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिली आहे.

हा फोटो पोस्ट करताना भारतीने चाहत्यांना विचारले, सँटा येणार की सँटी? तुम्हाला काय वाटते, लवकर कमेंट करा आणि सांगा. त्यासोबत तिने हार्टवाला इमोजी देखील शेअर केला आहे. भारतीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. अन्‌ जास्तीत जास्त सेलिब्रेटींनी सँटी पाहिजे अशी कमेंट केली आहे. तिने आपण आई होणार असल्याचे सांगतानाही एक फोटो शेअर करून – ‘हे होतं आमचं सगळ्यात मोठं सरप्राइज… थांबलात का… सब्स्क्राइब करा’, अशी कॅप्शन दिली होती.

सध्या भारती ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना दिसत आहे. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक पात्र साकारलं होतं. या लल्लीने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.