सौंदर्यवर्धक नारळ पाणी (Coconut Water Maintains...

सौंदर्यवर्धक नारळ पाणी (Coconut Water Maintains Yours Beauty)

Coconut Water, Beauty

नारळ पाण्याचे आरोग्यदायी लाभ तर आपण सारेच जाणतो. मात्र नारळ पाणी सौंदर्यासाठीही अतिशय लाभदायक आहे.
तहान भागवण्यासाठीचा थंड आणि गोड नैसर्गिक पर्याय म्हणजे नारळ पाणी. आयुर्वेदानुसार, नारळ पाणी निसर्गतः तणाव कमी करण्यास मदत करतं. अशा या नारळ पाण्याचे आरोग्यदायी लाभ तर आपण सारेच जाणतो. मात्र हे पाणी सौंदर्यासाठीही अतिशय लाभदायक आहे. त्वचा आणि केसांवर लावल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. त्याविषयी-

त्वचेसाठी…
8 नारळ पाणी लावून अतिनील सूर्यकिरणांपासून होणारं त्वचेचं नुकसान टाळता येतं. यामधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि भरपूर प्रमाणातील क-जीवनसत्त्व सनबर्न कमी करण्यासही मदत करतं.
8 नारळ पाण्यामध्ये सायटोकाइन्स आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. सायटोकाइन्स पेशींना विकसित आणि सक्रिय करतं.
8 नारळ पाणी त्वचेवर नियमितपणे लावल्यास मुरुमं, अ‍ॅक्ने, डाग आणि सुरकुत्यांपासून सुटका होते.
8 नारळ पाण्यामध्ये अँटी-अ‍ॅलर्जिक, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुण आहेत.
8 एक्झिमासारख्या त्वचेसंबंधी समस्यांवर नारळ पाण्याचा घरगुती उपाय गुणकारी ठरतो.
8 नारळ पाणी त्वचेला आर्द्र ठेवून, पीएच लेव्हलचाही समतोल राखण्यास मदत करतं.
8 नारळ पाण्यातील पोटॅशियम, लॉरिक अ‍ॅसिड आणि सायटोकाइन्स त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात.
8 नारळ पाणी हे नैसर्गिक क्लिंजर आणि टोनर आहे. संवेदनशील त्वचेसाठी नारळ पाणी हे एक महत्त्वपूर्ण हायड्रेटिंग क्लिंजर ठरू शकतं.

Coconut Water, Beauty

केसांसाठी…
8 नारळ पाण्यामध्ये जीवनसत्त्व आणि लोह भरपूर प्रमाणात आहे. लोह केसांच्या मुळांना बळकट करतं आणि जीवनसत्त्वं केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. अर्थात, नारळ पाण्याच्या नियमित वापराने केसांचं गळणं कमी होतं.
8 नारळ पाणी लावल्यास, केसांची आर्द्रता टिकून राहते आणि ते रेशमी व मुलायम होतात. त्यामुळे वारंवार केसांचा गुंता होत असेल, तर केसांना तेल लावण्याऐवजी नारळ पाणी लावा. ते केसांसाठी हायड्रेटिंग सिरमचं कार्य करतं.
8 केसांच्या मुळाशी नियमितपणे नारळ पाणी लावल्यास कोरडी त्वचा आणि कोंड्याची समस्या उद्भवत नाही.
8 नारळ पाण्यामधील अँटी-फंगल गुणही केसांना उपयुक्त ठरतात.