नरगिस – नूतन यांनी बिकिनीमध्ये रुपेरी पडद...

नरगिस – नूतन यांनी बिकिनीमध्ये रुपेरी पडद्याचं वातावरण गरम केलं होतं… (Classic Bikini Babes Of Bollywood)

पन्नास आणि साठचं दशक म्हणजे क्लासिक चित्रपटाचं युग मानलं गेलं होतं. त्या काळात सामाजिक व कौटुंबिक चित्रपट बनत होते. त्यातील नायिका होत्या साध्याभोळ्या, साडी नेसलेल्या अन्‌ पारंपरिक भारतीय नारीचं दर्शन घडविणाऱ्या. या भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींनी आपला अभिनय, सौंदर्य यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवली होती. पण वेळ येताच त्या खूपच बोल्ड झाल्या. इतक्या की, त्यांनी सिनेरसिकांची झोप उडविली. तुम्ही पण बघा, त्यांचे बोल्ड अवतार…

नरगिस

नरगिसला राज कपूरने नावारूपास आणलं. या दोघांची रुपेरी पडद्यावर खूपच चांगली जोडी जमली होती. नरगिसने अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण ‘आवारा’ या चित्रपटात तिने बिकिनी घालून राज कपूर सोबत समुद्रकिनाऱ्यावर खूपच मौजमस्ती केली होती. तिला बिकिनीच्या अशा अवतारात पाहून तेव्हा फारच आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.

नूतन

हिने अभिनयात मोठी बाजी मारली होती. तिचा चेहरा इतका निरागस, गोड होता की, प्रत्येक सर्वसामान्य मुलगी तिच्यामध्ये स्वतःला पाहत होती. पण याच भोळ्या चेहऱ्याच्या नूतनने बिकिनी घालून बोल्ड अवतार धारण केला होता, हे फार कमी लोक जाणतात. ‘दिल्ली का ठग’ या चित्रपटात तिनं बिकिनीचं धाडस दाखवलं होतं.

तनुजा

नूतनची धाकटी बहीण तनुजा चित्रपटात आली अन्‌ तिच्यापेक्षा वेगळ्या, म्हणजे मॉडर्न अवतारात पहिल्यापासून रुपेरी पडद्यावर वावरली. तिनं बिकिनी घातली. ही तिला शोभून दिसली होती.

नलिनी जयवंत

नूतन आणि तनुजा यांची नलिनी जयवंत मावशी होती. ती देखील त्या जमान्यातील सोज्वळ भूमिका करणारी नटी होती. तिच्या सौंदर्याची लोक तारीफ करत. नलिनीने ‘संग्राम’ या चित्रपटात बिकिनी घालून धीटपणा दाखवला. या प्रसंगी नायक अशोक कुमारला ती मोहात पाडताना दाखवली होती.

वैजयंतीमाला

ही दिसायला सुंदर होती, अन्‌ तेवढीच छान नर्तकी होती. मात्र ‘संगम’ चित्रपटात रेड हॉट बिकिनी घालून तिने राज कपूर सोबत बोल्ड प्रसंग रंगवले होते.

शर्मिला टागोर

व्यक्तिगत जीवनात शर्मिला खूपच स्टायलिश होती. रुपेरी पडद्यावर मात्र सोज्वळ भारतीय नारी म्हणून तिचा बोलबाला होता. पण ‘ॲन इव्हनिंग इन पॅरीस’ या चित्रपटात तिचा बिकिनीतला वावर खूपच गाजला होता. ‘आसमान से आया फरिश्ता’ या शम्मी कपूरने पडद्यावर गायलेल्या गाण्यात ती बिकिनीत सहजपणे वावरली. तिच्या कमनीय देहाला बिकिनी शोभून दिसली.

सायरा बानू

हिचा चेहरा भोळाभाबडा होता. अन्‌ तिचं हास्य देखील निरागस होतं. तिच्या सौंदर्याची भूल दिलीप कुमारला पडली. अन्‌ त्याने तिच्याशी निकाह लावला. सायराने ‘एप्रिल फूल’ या चित्रपटात स्विमींग पूलमध्ये बिकिनी घालून आपणही बोल्ड असल्याची झलक दाखवली होती.

राखी

सुंदर डोळे आणि विलोभनीय रूप ही राखीची बलस्थाने होती. अभिनयातही तिने लोकप्रियतेचे क्षितीज पार केलं होतं. सोज्वळ भूमिका करत असतानाच ‘शर्मिली’ या चित्रपटात तिनं बिकिनीमध्ये बिनदिक्कतपणे वावरून सिनेरसिकांना चकित केलं होतं. या चित्रपटात तिचा डबल रोल होता. व्हॅम्पची भूमिका तिने सोज्वळ भूमिकेप्रमाणेच सहजतेने निभावली होती.