सीआयडी मालिकेत गन्हेगारांच्या नाकीनऊ आणणाऱ्या इ...

सीआयडी मालिकेत गन्हेगारांच्या नाकीनऊ आणणाऱ्या इनस्पेक्टर सचिन म्हणजे अभिनेता ऋषिकेश पांडेकडे झाली चोरी! पैसे आणि महत्वाची कागदपत्रे घेऊन चोर फरार.. (CID Actor Hrishikesh Pandey Robbed Off Cash, Cards And Important Documents)

तब्बल २१ वर्षे छोट्या पडद्यावर राज्य केलेली सुप्रसिद्ध मालिका सीआयडी ही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना इतके खरे वाटायचे की त्यांच्या खऱ्या नावाऐवजी लोक त्यांना त्या मालिकेतील नावानेच ओळखू लागले होते.

या मालिकेत इन्स्पेक्टर सचिन हे पात्र साकारणारा अभिनेता ऋषिकेश पांडे (Hrishikesh Pandey) प्रेक्षकांना खरोखरचं पोलीस आहे असे वाटायचा. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ऋषिकेशकडे चोरी झाली आहे. ५ जूनला कुटुंबियांसोबत दक्षिण मुंबईत फिरत असताना त्याच्यासोबत ही घटना घडली. त्यावेळी चोर त्याचे पैसे आणि महत्वाचे कागद पत्र घेऊन फरार झाला.

याबाबत स्वत: ऋषिकेशने खुलासा करत सांगितले, तो त्याच्या कुटुंबियांसोबत कुलाब्याला गेला असताना साइट सीईंगसाठी एसी बसमध्ये चढला. पण उतरल्यावर जेव्हा त्याने त्याची बॅग उघडली तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या बॅगेतून त्याचे पैसे, पॅन कार्ड, आधार कार्ड, क्रेडीट कार्ड, आयडी कार्ड आणि काही महत्वाची कागद पत्रे गायब आहेत.  त्याच्या सर्व डॉक्युमेंटस् आणि आयडी कार्डचा कोणी गैरवापर करु नये यासाठी त्याने लगेच कुलाबा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली.

ऋषिकेश मालाडला राहतो त्यामुळे त्याने मालाड पोलीस स्टेशनला सुद्धा घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. अभिनेता काही वर्षांपूर्वी कुलाब्यालाच राहायचा. 5 जूनला तो त्याच्या कुटुंबाला घेऊन एलिफंटा केव्हज् येथे फिरायला गेलेला. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्याने ताडदेव येथून बस पकडली. बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे त्याला चोरी कधी आणि कुठे झाली हे लक्षात आले नाही.

ऋषिकेश पुढे सांगितले की, सीआयडीमध्ये असताना मोठमोठ्या केस सोडवायचा आणि आता त्याच्याकडेच चोरी झाली असे म्हणून लोक माझी चेष्ठा करत आहे. सीआयडी या मालिकेत लोक त्यांच्या अडचणा घेऊन आमच्याकडे यायचे तेव्हा आम्ही त्यांची केस सोडवायचो. माझ्या खऱ्या आयुष्यातसुद्धा लोक माझ्याकडे अनेक समस्या घेऊन येत असतात तेव्हा त्या मी सोडवून देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पण आता मलाच चोरांनी लुटले आहे. त्यामुळे पोलीस यात मला लवकरात लवकर मदत करुन माझी समस्या सोडवतील अशी आशा आहे.

ऋषिकेशने सीआयडी व्यतिरिक्त कोई अपना सा, आहट,ढाई अक्षर प्रेम का, पोरस, हमारी बेटियों का विवाह या मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला त्याला खरी ओळख इन्स्पेक्टर सचिन म्हणूनच मिळाली.