डेट वॉलनट कपकेक (Christmas Special : Date Waln...
डेट वॉलनट कपकेक (Christmas Special : Date Walnut Cup Cake)

साहित्य : १२० ग्रॅम मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, ४० ग्रॅम रिफाइंड तेल, ८० ग्रॅम कॅस्टर शुगर, अर्धा कप ताक, १६० ग्रॅम बिया नसलेले खजूर.
फ्रॉस्टिंगसाठी : अर्धा कप फ्रेश क्रीम, १ टेबलस्पून अक्रोडाचे लहान तुकडे.

कृती : मैदा, सोडा आणि बेकिंग पावडर चाळणीने एकत्र चाळून घ्या. तेल, कॅस्टर शुगर, ताक आणि खजूर एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात थोडं थोडं करून मैद्याचं मिश्रण घाला आणि कट अँड फोल्ड पद्धतीने एकत्र करा. कपकेकच्या साच्यामध्ये कपकेक लायनर्स लावून त्यामध्ये हे मिश्रण अर्ध्यापेक्षा थोडं जास्त भरा. १८० डिग्री प्रीहिटेड ओव्हनमध्ये १० ते १२ मिनिटं हे कपकेक बेक करा. केक बेक झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या.
फ्रॉस्टिंगसाठी, क्रीम फेटून त्यामध्ये अक्रोडाचे तुकडे घाला.
हे मिश्रण आयसिंग बॅगमध्ये भरून, थंड झालेल्या कपकेक्सवर फ्रोस्ट करा.