बॉलिवूड सिताऱ्यांनी मौजमस्ती, जल्लोषात साजरा के...

बॉलिवूड सिताऱ्यांनी मौजमस्ती, जल्लोषात साजरा केला ख्रिसमस (Christmas Celebrations By Bollywood Stars)

कालच्या दिवसात बॉलिवूड सिताऱ्यांनी मौजमस्ती करत व अत्यंत आनंदात नाताळाचा सण (Christmas Celebrations) साजरा केला.

अमिताभ बच्चनने सांताक्लॉजची टोपी घालून लोकांना काळजी घेण्याचा संदेश देत व खूप प्रेम व्यक्त करत नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

तर जिनेलिया डिसुझा-देशमुख हिने रंगीबेरंगी फुग्यांमध्ये वावरत वेगवेगळ्या पोझेस देऊन आपले फोटो शेअर केले. अन्‌ लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

Christmas Celebrations

टी. व्ही. तारका एरिका फर्नांडिसने घरातील माणसे व मित्र-मैत्रिणींसह पार्टी दिली. छानपैकी घर सजविले आणि बाल्कनीमध्ये सांताक्लॉजसह हा सण साजरा केला.

Christmas Celebrations

माधुरी दिक्षितने व्हिडिओ मधून लोकांना सुरक्षित व आनंदी नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. कृती खरबंदाने सांताक्लॉजचा ड्रेस घालून छानशी पोज दिली. करिश्मा कपूर, तापसी पन्नू, प्रीति झिंटा, शिल्पा शेट्टी इत्यादी कलाकारांनी पण नाताळ जल्लोषात साजरा केला. सोहा अली खानने आपली आई शर्मिला टागोर, मुलगी आणि नवरा कुणाल खेमू यांच्याबरोबर आनंद व्यक्त केला.

Christmas Celebrations
Christmas Celebrations
Christmas Celebrations

शिल्पा शेट्टी गढवालमध्ये आहे. उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये ती आपली मुले व कुटुंबासह सहलीचा आनंद घेत आहे.

फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम