चित्राने भजी तळून पहिल्या पावसाचे स्वागत केले (...

चित्राने भजी तळून पहिल्या पावसाचे स्वागत केले (Chitra Welcomes First Rain On The Sets Of ‘Jeev Maza Guntala’ By Frying Bhajiya)

सगळीकडेच एका गोष्टीची चाहूल लागली आहे…. आपण सगळेच आतुरतेने वाट बघत आहोत आणि ती म्हणजे पाऊस कधी पडणार… पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो सगळ्यांनाच खूप आवडतो. आणि याचसोबत जर भजी आणि चहा मिळाला तर मग अजून काय हवं नाही का? पाऊस म्हटलं की बरेच काही बेत आपण आखत असतो. पण कलाकार मात्र दिवस रात्र शूटिंगमध्ये असतात. मग अश्यावेळी सेटवरच जर कोणी पार्टीचा बेत आखला तर ….

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेचे शूट कोल्हापूर येथे सुरू आहे. आणि शूट करत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला अन्‌ शूट थांबले… आणि हीच संधी साधून आपल्या सगळ्यांची लाडकी चित्रा म्हणजेच प्रतीक्षा मुणगेकर हिने सेटवर संपूर्ण युनिटसाठी बनवली कांदा आणि बटाटा भजी… सगळ्या कलाकारांनी आणि सेटवरील इतर युनिटने गरम गरम चहा सोबत भजीचा मनसोक्त आनंद घेतला.

चित्रा म्हणजेच प्रतीक्षाने सेटवर असे सरप्राईज देण्याची ही पहिली वेळ नव्हे. या मालिकेमध्ये चित्रा जरी नकारात्मक भूमिकेत असली तरी तिने भजी बनवण्याचे काम मात्र छान केले आहे.